Tarun Bharat

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

अच्छे दिनच्या नावाखाली देशभर महागाई वाढली आहे. केंद्राकडे जीएसटीचा परतावा द्या, मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी गुजरातप्रमाणे निधी द्या, या मागण्यांसाठी केंद्र सरकारचे महाविकास आघाडीने लक्ष वेधले. परंतू केंद्र सरकारकडून राज्याला निधी देताना सापत्न वागणूक दिली जात आहे, असा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला. कोल्हापुरातील दिलासा संस्थेचा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडी सरकार बनवले.या सरकारला 16 नोव्हेंबर रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. केंद्र सरकारच्या दुजाभावाच्या वागणुकीमुळे महाविकास आघाडी सरकारला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे, परंतू मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेला धीर देण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा प्रशासनावर वचक असल्याने 99.99 टक्के लोकांचे प्रश्न मागीं लावून त्यांना न्याय मिळत आहे. दिवाळीपूर्वी पूरग्रस्तांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच कोरोना आटोक्यात आल्याने सध्या मी कोरोनामुक्त गावाशी संपर्क साधत आहे. प्रत्येक जिल्हÎातील असंघटीत क्षेत्राला 40 ते 50 कोटी रूपये थेट मदत मिळाली आहे.

अपहणारचे समर्थन करणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही

महिलांवर अत्याचारासंदर्भात बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, अपहरण करणाऱयांचे समर्थन करणारे आणि दोन लग्न करणाऱया व्यक्ती अशा प्रकारची टीका करीत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मात्र महिलांच्या सुरक्षेसाठी जे उपाय करावे लागतात ते राज्य सरकार करीत आहे. महिला आयोग 1993 सालापासून अस्तित्वात आहे. परंतू अलीकडे महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाचे सरकार असो, गुन्हÎांच्या दोषसिध्दीचे प्रमाण वाढवण्यासाठी शक्ती कायदÎासह अन्य यंत्रणांचा वापर सरकारने केला पाहिजे. सध्या मी प्रत्येक जिल्हÎातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा आढावा घेत आहे. येत्या दोन महिन्यात जास्तीत जास्त प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई झालेली दिसेल.

सरकारच्या कामाची पोचपावती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर कोरोना आणि महापुर या संकटांमध्ये अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. संकटातही सरकारने केलेल्या कामामुळे नागरीकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. या कामाची पोचपावती आगामी स्थानिक सवराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये मिळेल, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

Related Stories

हातकणंगले तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेच्या लढ्याला अखेर यश

Sumit Tambekar

कोरोना लवकर जावूदे, सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे

Abhijeet Shinde

कसबा सांगाव गायरान जमीन विनापरवाना बांधकामावर कारवाईची मागणी

Sumit Tambekar

परतीच्या पावसाचा खरीप हंगामातील पिकांना फटका बसणार

Abhijeet Shinde

‘निकाल होईपर्यंत मेगा भरती थांबवा’

Abhijeet Shinde

कळे येथील सुरेश सुतार यांनी मॅजिक स्क्वेअर बनवत केला जागतिक विक्रम

Abhijeet Shinde
error: Content is protected !!