Tarun Bharat

केंद्र सरकारकडून 43 ॲप्सवर बंदी

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

केंद्र सरकारने पब्जी, टिकटॉकनंतर आणखी 43 ॲप्सवर बंदी घातली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्विट केले आहे.

देशाच्या एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहचवणारी तसेच यूजर्सना असुरक्षित असलेल्या 43 ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. भारताच्या सुरक्षा विभागाने या कारवाई संदर्भात सूचना केली होती. 

केंद्र सरकारने डोकलाममधील कारवाईनंतर 29 जूनला 59 तर 2 सप्टेंबरला 118 चिनी ॲप्सवर बंदी घातली होती. त्यामध्ये लोकप्रिय  गेम ॲप पब्जीसह बायडू, लाईफ अफ्टर, लुडो वर्ल्ड, ॲप लॉक, कॅरम फ्रेंड्स, टणटण यासारख्या ॲपचा समावेश होता. बंदी घालण्यात आलेल्या काही ॲपच्या माध्यमातून यूजर्सचा डेटा चोरी होत असल्याच्या तक्रारी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडे दाखल झाल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.

Related Stories

अमरावती हिंसाचार प्रकरणी अनेक भाजप नेत्यांना अटक

Abhijeet Khandekar

केतकी चितळेच्या अडचणीत वाढ

datta jadhav

अविनाश भोसले यांचं हेलिकॉप्टर CBI कडून जप्त

datta jadhav

सागर राणाच्या पीएम अहवालानंतर सुशील कुमारच्या अडचणीत वाढ

Archana Banage

देशातील ‘७५ समुद्रकिनारे’ होणार स्वच्छ…

Nilkanth Sonar

‘अटल टनल रोहतांग’ बोगद्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

datta jadhav
error: Content is protected !!