Tarun Bharat

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दुकाने उघडण्यास परवानगी द्या

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

कोरोना महामारीला अटकाव  करण्यासाठी देशभरात  लॉक डाऊन सुरु असून किराणा माल, मेडिकल, भाजीपाला आणि दूध विक्री केंद्र वगळता इतर सर्वप्रकारची दुकाने बंद आहेत. इतर सर्व दुकाने बंद असल्याने मोलमजुरी, रोजंदारी करणाया आणि हातावर पोट असणाया लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने आजपासून देशभरातील सर्व दुकाने काही बंधने घालून सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे हॉटस्पॉट वगळता इतर ठिकाणची दुकाने स्थानिक परिस्थिती पाहून सुरु करण्याचा निर्णय  राज्य सरकारने आणि सातारा जिल्हा प्रशासनाने घ्यावा आणि या लॉक डाऊनमध्ये गरजू लोकांना रोजीरोटी मिळण्यासाठी आणि रोढावलेल्या  अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. 

संपूर्ण जगाला महाभयंकर कोरोना विषाणूने ग्रासले असून आपल्या देशातही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाने हाहाकार उडाला असून कोरोनाला आळा घालण्यासाठी सुमारे महिनाभरापासून देशभरात लॉक डाऊन सुरु आहे. लॉक डाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने, छोटे-  मोठे उद्योग आणि  सर्वप्रकारची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. लॉक डाऊनची काटेकोर अंमलबजावणी सुरु असून कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी लॉक डाऊन हा सर्वोत्तम पर्याय आहे. गेले महिनाभरापासून लॉक डाऊन सुरु असून आज केंद्र सरकारने कोरोनाचे हॉटस्पॉट वगळून इतर ठिकाणी  लोकांच्या सोयीसाठी सर्वप्रकारची दुकाने काही नियम व अटी घालून चालू करण्यास परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारने महाराष्ट्रात आणि सातारा जिल्हा प्रशासनाने जिह्यात हॉटस्पॉट वगळून इतर सामान्य ठिकाणची दुकाने स्थानिक परिस्थिती पाहून सुरु करण्यास परवानगी दिली पाहिजे. 

ज्या ठिकाणची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली जाईल त्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर वापर बंधनकारक करावा तसेच गर्दी होऊ नये यासाठी सोशल डिस्टंसिंग असे नियम व अटी घालूनच अशी दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. कोरोनाच्या हाहाकारामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले असून अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला आहे. असंख्य लोकांची रोजीरोटी बंद झालेली आहे तसेच बाजारपेठा, दुकाने बंद असल्याने अर्थव्यवस्थेला खीळ बसलेली आहे आणि याचा विपरीत परिणाम जनजीवनावर झाला आहे. केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला चालना मिळून गोरगरिबांच्या रोजीरोटीसाठी दुकाने सुरु करण्याबाबत निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आणि घालून दिलेल्या अटी शर्थींचे बंधन घालून राज्य सरकार आणि सातारा जिल्हा प्राशासनाने हॉटस्पॉट वगळून इतर ठिकाणची दुकाने तेथील परिस्थिती पाहून  सुरु करण्यास परवानगी द्यावी आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलून जनजीवन सूरळीत होण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा,आणि ग्राहक व जनतेला दिलासा द्यावा  असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

Related Stories

मायक्रो कंटेन्मेंट झोनच्या स्टिकरला विलंब

Patil_p

सुप्रिया सुळेंचे ‘ब्रीच कँडी’च्या गेटवरुन पंढरपूरच्या मतदारांसाठी थेट भाषण

Archana Banage

साखळय़ा तोडण्याचे आव्हान

Patil_p

राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत साताऱयाला 12 पदके

Patil_p

उत्तर प्रदेशात फक्त ‘जंगलराज’ : अनिल देशमुख

Tousif Mujawar

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण पूरग्रस्त भागाची करणार पाहणी

Archana Banage
error: Content is protected !!