Tarun Bharat

केंद्र सरकारने खासगीकरण थांबवावे

Advertisements

भीम आर्मी संघटनेचे निवेदन

प्रतिनिधी/ बेळगाव

सरकारी विभागाचे जे खासगीकरण सुरु आहे ते थांबणे गरजेचे आहे. याचबरोबर अनुसुचित जाती-जमाती आणि मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजना आणि आरक्षण वेळेत देणे गरजेचे आहे. याचबरोबर केंद्र सरकारने शेतकरी विरोधक विधेयक मांडून शेतकऱयांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. ते विधेयक मागे घ्यावे यासह इतर मागण्यांसाठी भीम आर्मी संघटनेने जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.

केंद्र सरकारने सरकारी विभागाचे खासगीकरण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढणार आहे. सर्वात जास्त फटका अनुसुचित जाती-जमातीला बसणार आहे. तेंव्हा खासगीकरण थांबवावे. घटनेने मागासवर्गीयांना जे अधिकार दिले आहेत ते अधिकार त्यांना द्यावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने नुकतेच शेतकऱयांच्या विरोधात जे विधेयक मांडले आहे त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. तेंव्हा ते विधेयकही मागे घ्यावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी यशराज भोर, मतीन कुमार, सुनील कोटबागी, मुनप्पर हुसेन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

कपिलेश्वर तलावात सांडपाणी मिसळल्याने पाणी झाले दूषित

Nilkanth Sonar

एमएलआयआरसीचा प्रशिक्षणार्थी जवान बेपत्ता

Amit Kulkarni

देसूरहून गर्लगुंजी मार्गे रेल्वे मार्गाला शेतकऱयांचा कडवा विरोध

Patil_p

कोथिंबीरसह अन्य भाज्यांच्या दरात वाढ

Amit Kulkarni

मिशन एसएसएलसी अखेर फत्ते…!

Patil_p

सुळगा येथे टिप्पर चालकावर चाकू हल्ला

sachin_m
error: Content is protected !!