Tarun Bharat

केंद्र सरकारने ७४ कोटी लसीच्या डोसची मागणी नोंदवली

Advertisements

नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी यांनी १८ ते ४४ वयोगटासाठी मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली. त्यानुसार आता केंद्र सरकारने मोफत लसीकरणाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी लसीच्या ७४ कोटी लसींच्या डोसची ऑर्डर केंद्र सरकारने दिली आहे. यासंदर्भात निती आयोगाचे आरोग्यविषयक सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दुपारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

लसीकरणासंदर्भात माहिती देताना डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, केंद्र सरकारने कोविशिल्डचे २५ कोटी डोस, कोवॅक्सिनचे १९ कोटी डोस तर बायोलॉजिकल ई च्या ३० कोटी डोसची मागणी नोंदवली आहे. संबंधित उत्पादकांकडून या डोसचा पुरवठा तातडीने सुरू करण्यात येणार असून डिसेंबरपर्यंत हे सर्व डोस मिळणार आहेत. यातील बायोलॉजिकल ई चे डोस सप्टेंबरपर्यंत मिळतील. केंद्र सरकारने लसींच्या मागणीसाठी आधीच सिरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेकला ३० टक्के रक्कम अदा केली असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी यांनी १८ ते ४४ वयोगटासाठी मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली. तसेच, यासाठी केंद्र सरकारच लस खरेदी करून ती राज्य सरकारांना पुरवणार असून एकूण ७५ टक्के लसींचे डोस केंद्र सरकार तर २५ टक्के लसीचे डोस हे खासगी क्षेत्रामध्ये विक्री होतील, अशी देखील घोषणा पंतप्रधानांनी केली होती. त्यानुसार आता केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरूवाच केली आहे.

Related Stories

मध्यप्रदेशातील ‘या’ दोन जिल्ह्यात नाईट कर्फ्यू

Rohan_P

महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्णाचा पहिला मृत्यू

Abhijeet Shinde

काँग्रेस आमदार प्रणव गोगोईंचे निधन

Patil_p

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जन्मलेल्या मालमत्तेत वाटा

Patil_p

कारगिलमध्ये बौद्ध मठ निर्मिती आंदोलनावरून वाद

Patil_p

तेजप्रताप यादवांना स्वप्नांमध्ये दिसते भूत

Patil_p
error: Content is protected !!