Tarun Bharat

केंद्र सरकार संवेदनशील, पंतप्रधान मोदींचा शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद : बोम्माई

बंगळूर / प्रतिनिधी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी शुक्रवारी सांगितले की, तीन वादग्रस्त शेतीविषयक कायदे रद्द करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय सरकार संवेदनशील असल्याचे दर्शवितो. शेतकऱ्यांच्या मागणीला मोदींनी प्रतिसाद दिला आहे, असे ते म्हणाले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, तीन वादग्रस्त शेतीविषयक कायदे रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद दिला आहे, या निर्णयावरून मोदीसरकार संवेदनशील असल्याचे दिसते असे ते म्हणाले. “ सरकार झुकण्याचा प्रश्नच नाही. उदारीकरण आणि जागतिकीकरणाची ही प्रक्रिया 1991-92 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झाली. त्याचाच एक भाग म्हणून विविध कायदे तयार केले जाणार होते. पुढे, यूपीए सरकारने जागतिक व्यापार संघटनेशी करार केला होता. कृषी सुधारणा आणि कृषी विपणन सुधारणा हा देखील त्याचा एक भाग होता,” बोम्माई यांनी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या निषेधापुढे नतमस्तक झाल्याचे नाकारले.

बोम्माई यांच्या म्हणण्यानुसार, यूपीए सरकारच्या काळात विधेयकाचा मसुदा प्रलंबित होता आणि काही बदल करून आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यासाठी सर्व राज्यांचे एकमत घेऊन निर्णय घेण्यात आला. “तथापि, पंजाब, हरियाणा आणि इतर राज्यांतील शेतकऱ्यांनी नियंत्रित बाजार व्यवस्थेचा आग्रह धरला आणि एक वर्ष निदर्शने केली. मोदींनी शेतकरी नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण ते मान्य झाले नाहीत, असेही ते पुढे म्हणाले.

Related Stories

बळीराजाने दुबार पेरणीला केली सुरूवात

Patil_p

ग्रामपंचायत निवडणूक अनेक गावात कमळ फुलणार

Patil_p

खानापूरला एकाच दिवशी 82 दावे निकाली

Amit Kulkarni

योग्य माहिती देवूनच पॅकेजचा लाभ घ्या

Amit Kulkarni

कोरोना वॉरियर्स म्हणून नोकरीत सामावून घ्या

Amit Kulkarni

घराचे छत कोसळून महिला ठार

Amit Kulkarni