Tarun Bharat

केआयटीच्या 29 विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी कंपनीत निवड

मेकॅनिकलच्या 24 तर सिव्हिलच्या 5 विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार लाखाचे पॅकेज

प्रतिनिधी / कोल्हापूर

केआयटी महाविद्यालयातील मेकॅनिकल व सिव्हिल विभागातील 29 विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॅपजेमिनी या कंपनीमध्ये निवड झाली आहे. जर्मनीस्थित ही कंपनी जगभरातील विविध उद्योगांना माहिती तंत्रज्ञानाचे दर्जेदार पाठबळ देते, अशी माहिती केआयटीचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी व उपाध्यक्ष साजिद हुदली यांनी दिली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

कंपनीने केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्राधान्य देऊन येथे कंपनीसाठी भरती प्रक्रिया राबवली. प्राथमिक परीक्षा, विविध मुलाखतींच्या माध्यमातून योग्य प्रकारे मुलांना पारखून कंपनीने एकाच वेळी 29 विद्यार्थ्यांची निवड केली. या कंपनीने विद्यार्थ्यांना वार्षिक 4 लाखांचे पॅकेज घोषित केले आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विद्यार्थ्यांची निवड झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निवडीसाठी मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख डॉ. उदय भापकर, सिव्हिल विभागप्रमुख मोहन चव्हाण, ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉ. अमित सरकार, प्रा.आशिष पाटील, प्रा प्रवीण गोसावी, गुरुप्रसाद चव्हाण यांनी मुलांच्या पूर्वतयारीसाठी मोठय़ा प्रमाणात परिश्रम घेतले.

केआयटीचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दिपक चौगुले, कार्यकारी संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, संचालक डॉ. एम. एम. मुजुमदार यांनी विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Stories

उजळाईवाडीतील हॉस्पिटलने बिलासाठी १४ तास बॉडी अडविली

Archana Banage

पानसरे हत्या प्रकरण : अंदूरे व कुरणेच्या जामीन अर्जावर २१ ऑगस्टला सुनावणी

Archana Banage

‘फुलेवाडी’च्या ग्राऊंडवर ‘वानखेडे’चे ‘लॉन’!

Archana Banage

शहरात भटक्या कुत्र्यांवर ऍसिड हल्ले

Archana Banage

शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू ची राज्यात चर्चा …    

Kalyani Amanagi

कोल्हापूर : साळोखेनगर येथे चोरट्यांचा धुमाकूळ

Abhijeet Khandekar