Tarun Bharat

केएमटी बसला ट्रकची धडक प्रवाशी जागीच ठार, सात जखमी

वार्ताहर / उचगाव

केमटी बसला आयशर ट्रकने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेने उद्धव सदाशिव पाटील (वय 56, रा. विद्या कॉलनी, पेठवडगाव) हे शिक्षक प्रवासी जागीच ठार झाले, तर बसचालक हंबीरराव यादव (रा. वरणगे पाडळी) यांच्यासह सात जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी सव्वा सातच्या दरम्यान पुणे-बेंगलोर महामार्गावर उचगाव हद्दीतील वीटभट्टी जवळ झाला. ट्रकचालक बेपत्ता झाला आहे. जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोल्हापूर-कागल मार्गावर केएमटी बस तावडे हॉटेलमार्गे कागलकडे जात होती. यावेळी मागून आलेल्या भरधाव मालवाहतूक ट्रकने बसला वीट भट्टीजवळ जोराची धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, बसच्या मागील भागाचा चक्काचूर झाला. यावेळी घटनास्थळी ग्रामस्थांनी ऍब्युलन्स इतर वाहनाच्या मदतीने जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. 

उद्धव पाटील बसच्या दरवाजातून बाहेर फेकले गेल्याने त्यांच्या डोक्मयास गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. ते आपल्या सहकारी शिक्षकांसमवेत कागल येथील शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथील पारितोषिक वितरण समारंभासाठी  जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

  जखमींची नावे अशी ः मधुकर यादव (वय 50, रा. कणेरीवाडी), गौस सुतार (54, रा. सदरबाजार), रुपा सुतार (55, रा. मुलुंड, मुंबई), रमेश गुरव (65, रा. मुलुंड, मुंबई), शिवराम चौधरी (26, रा. कागल), चालक हंबीरराव यादव (57, रा. वरणगे पाडळी), सतिश कुंभार (बसवाहक- 55, रा. बापट कॅम्प कोल्हापूर). या सर्वाना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच जखमींच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराने रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली. याबाबतची फिर्याद उद्धव पाटील यांचे सहकारी शिक्षक कुतुबुद्दीन बाबासाहेब शिकलगार (रा. सुभाषनगर मिरज) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

परिते येथे डंपरखाली सापडल्याने महिला जागीच ठार

Abhijeet Khandekar

महाराष्ट्रातल्या साहित्य रसिकांना कर्नाटक पोलिसांनी अडवून दाखवावे

Archana Banage

कारवाईची भिती घालून 25 लाखांच्या लाचेची मागणी

Abhijeet Khandekar

‘राजाराम’ निवडणूक विरोधातील दावा फेटाळला

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात 1,192 जणांना कोव्हिशिल्ड लसीकरण

Archana Banage

फेरीवाल्यांचे औद्योगिक महामंडळाच्या कार्यालयात लोटांगण आंदोलन

Abhijeet Khandekar