Tarun Bharat

केएलईच्या एमबीए विभागातर्फे मार्गदर्शनपर कार्यक्रम

प्रतिनिधी /बेळगाव

केएलई टेक्नॉलॉजीकल युनिर्वसिटी, डॉ. एम. एस. शेशगिरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍन्ड टेक्नॉलॉजीच्या एमबीए विभागातर्फे नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करत तीन दिवसीय मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एमबीए विभागाचे प्रमुख डॉ. प्रयाग गोखले यांनी आपल्या स्वागत भाषणात एमबीए करताना विद्यार्थी दशेपासून उत्तम व्यवस्थापकपर्यंत आयुष्य कसे घडवावे याचे मार्गदर्शन केले.

डीन डॉ. एस. एफ. पाटील यांनी केएलई टेक्नॉलॉजी युनिर्वसिटीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी काही घटनांचे उदाहरण देऊन कठोर अभ्यास, वेळेचे व्यवस्थापन, चिकाटी या व्यवसायिक पायऱया आहेत. त्याचबरोबर  उत्तम व्यवस्थापक बनण्यासाठी इच्छित कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. डीन डॉ. प्रवीण घोरपडे यांनी विश्वविद्याालयाच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली व उपस्थितांना मार्गदर्शनपर कार्यक्रमाचा हेतू व वैशिष्ठे समजावून सांगितली.

प्राचार्य डॉ. बसवराज कटगेरी यांनी, एनइपी-2020 अंतर्गत विश्वविद्यालयाच्या आवारात पायाभूत सुविधा व नवे उपक्रम चालू केले आहेत. केएलई विश्वविद्यालयाचा नवीन अभ्यासक्रम हा कौशल्य विकास करण्यास मदत करणारा आहे एमबीएचे विद्यार्थ्यी इंजिनिअरींग विद्यार्थ्यांसोबत शिकताना त्यांच्यात ज्ञानवृद्धी होते व विविध प्रकल्प हाताळायला मिळाल्याने सहजरित्या  उद्योग-व्यवसायात उतरतात. प्रा. संजय हांजी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पेले. प्रा. वैभव बॅडगी यांनी सूत्रसंचलन केले. सौरभ पोटे यांनी आभार मानले.

Related Stories

रिंगरोडविरोधात 823 हरकतींची नोंद

Amit Kulkarni

मध्यवर्ती बसस्थानकात धुळीचे साम्राज्य

Amit Kulkarni

धोबीघाटजवळ जुगारी अड्डय़ावर छापा

Amit Kulkarni

गांधीनगर जवळ पाईप फुटून शेकडो लीटर पाणी वाया

Patil_p

भाविकांना करता येणार काशी दर्शन

Patil_p

लंम्पिमुळे राज्यात १८ लाख लिटर दुधाचे उत्पादनात घट – सिद्धरामय्या

mithun mane