Tarun Bharat

केएलईतर्फे वल्लभभाई पटेल जयंती साजरी

प्रतिनिधी/ बेळगाव

केएलई विद्यापीठातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांची 145 वी जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. प्रारंभी वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले यांची सर्वांचे स्वागत करून देशासाठी सध्या एकता, एकात्मता, सुरक्षितता महत्त्वाची आहे असे सांगितले. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचाही परिचय करून दिला.

प्राचार्य जे. एन. महंतशेट्टी यांनी सर्वांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. एनएसएसच्या समन्वयक डॉ. अश्विनी नरसण्णवर यांनी आभार मानले. एनएसएस अधिकारी डॉ. नागराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास प्राचार्य, विद्यापीठाचे अधिकारी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम साधेपणाने व नियमांचे पालन करून पार पडला.

Related Stories

चक्रीवादळाच्या धोक्मयामुळे गांधीधाम एक्स्प्रेस रद्द

Patil_p

‘त्या’ 22 शाळांना शनिवारीही सुट्टी

Rohit Salunke

बागलकोट येथे 13 पासून प्रवेश परीक्षा

Omkar B

चोऱयांच्या सत्राने मारुतीनगरवासीय भयभीत

Amit Kulkarni

लम्पीनंतर प्रथमच जनावरांचा आठवडी बाजार बहरला

Patil_p

सर्व्हर डाऊनमुळे ई-केवायसीचे काम पुन्हा ठप्प

Patil_p
error: Content is protected !!