Tarun Bharat

केएलईमध्ये आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषद

प्रतिनिधी /बेळगाव

येथील जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेज परिसरातील केएलई सेंटेनरी कन्व्हेन्शन सेंटर येथे शुक्रवारी तिसऱया आंतरराष्ट्रीय मातृत्व, नवजात, आणि बालक आरोग्य परिषदेचे उद्घाटन करण्यात आले आहे. ‘आज आपण एका आव्हानात्मक जगात रहात आहोत. आज जागतिक लोकसंख्येने कधी नव्हे इतकी उच्च पातळी गाठली आहे.

 वाढत्या लोकसंख्येच्या आरोग्याची व्यवस्था हे सर्वात मोठे आव्हान आज जागतिक आरोग्य क्षेत्रासमोर आहे. ते पेलण्यासाठी आपल्याला उपलब्ध असणारे सर्वोत्तम आरोग्य तंत्रज्ञान गरजवंत माणसापर्यंत पोहचविण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन या परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात केएलई सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष आणि केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च संस्थेचे चान्सेलर डॉ. प्रभाकर कोरे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात केले.   या परिषदेला जगातील अनेक तज्ञ आणि मान्यवर उपस्थित आहेत.

या संदर्भात जागतिक आरोग्य संघटना, राष्ट्रीय आरोग्य संस्था (अमेरिका), बिल अँड मेलिंडा गेट्स् फौंडेशन, थॉमस जेफरसन विद्यापीठ आणि इतर संस्थांनी भारताच्या आरोग्य विभागाशी तसेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि महिला तसेच बालके आरोग्य संशोधन संस्थेशी केलेल्या सहकार्यासाठी त्यांनी समाधान व्यक्त केले. माता आणि बालकांच्या आरोग्यासंबंधी केलेल्या संशोधनामुळे राष्ट्रीय आणि जागतिक आरोग्य धोरणाची दिशा निर्धारित करणे शक्य झाले, अशीही टिप्पणी डॉ. प्रभाकर कोरे यांनी त्यांच्या भाषणात केली.

परिषदेसाठी उपस्थित असणाऱयांचे स्वागत जेएनएमसीच्या चिल्ड्रन हेल्थ युनिटचे संशोधन संचालक डॉ. शिवप्रसाद गौडर यांनी केले. त्यांनी गेल्या 22 वर्षांमध्ये जेएनएमसीने हाताळलेले विविध प्रकल्प आणि आरोग्य क्षेत्रात केलेले महत्त्वाचे कार्य यांचा आढावा आपल्या स्वागतपर भाषणात घेतला. अमेरिकेच्या थॉमस जेफरसन विद्यापीठाचे अधिकारी डॉ. रिचर्ड डर्मन यांनी रीसर्च युनिटच्या ब्राऊशरचे अनावरण केले. त्यांनी त्यांच्या भाषणात आतापर्यंतच्या कामासंबंधी आणि सहकार्यासंबंधी समाधान व्यक्त केले तसेच भविष्याकाळासंबंधी आशावाद प्रगट केला.

परिषदेला सहकारी देश, तसेच आंतरराष्ट्रीय प्राधिकारणांचे अनेक ज्येष्ठ डॉक्टर्स, शास्त्रज्ञ आणि संशोधक उपस्थित आहेत. डॉ. पुष्पा देव चौधरी, डॉ. एम. इंदुमथी, डॉ. भारती कुलकर्णी, डॉ. मारियन कोसो-थॉमस, श्रीमती रेटाना हॉफस्टेटर, डॉ. रॉबर्ट जस्टीन ब्राऊन, डॉ. जिआन यान, डॉ. एलिझाबेथ मॅकक्ल्युअर, डॉ. नॅन्सी क्रेब्स, डॉ. एल्विन चोंबा, डॉ. अर्चना पटेल, डॉ. रिचर्ड डर्मन, डॉ. रॉबर्ट गोल्डनबर्ग आणि डॉ. बी. एस. कोडकिणी यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. या परिषदेला अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, स्विझर्लंड, ग्वाटेमाला, डेमेपेटिक रिपब्लिक ऑफ काँगो, केनिया, युगांडा, झांबिया, नायजेरिया, बांगला देश आणि भारत अशा 3 देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. केएलई संस्थेचे अनेक पदाधिकारीही परिषदेला उपस्थित आहेत.

Related Stories

गोकाक ग्लॅडिएटर्स संघाचा 11 धावांनी विजय

Patil_p

महामोर्चा-सायकल फेरीत मराठी भाषिकांनो ताकद दाखवून द्या

Amit Kulkarni

आयुष्मान भारत योजनेंतर्गत 19 रुग्णालयात उपचार

Amit Kulkarni

ऑर्फियस, राधी, चैत्र कथांचे नाटय़ात्मक रुपांतर

Omkar B

भाजप सरकार भ्रष्ट; 2023 मध्ये काँग्रेस सत्तेवर येणार

Patil_p

इंद्रजीत हलगेकर, ज्योती होसट्टी यांचा सत्कार

Amit Kulkarni