Tarun Bharat

केएलईमध्ये नव्याने नेत्रचिकित्सा विभाग सुरू

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल व वैद्यकीय संशोधन केंद्र यांच्यावतीने नव्यानेच नेत्रचिकित्सा विभाग सुरू करण्यात आला असून केएलई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विवेक सावजी यांच्या हस्ते हा विभाग जनसेवेत रुजू करण्यात आला.

यावेळी ते म्हणाले, समाजामध्ये प्रत्येकाला उत्तम आणि समान संधी मिळणे आवश्यक आहे. मुलांच्या विकासात शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, दृष्टिहीन मुलांना अशी संधी मिळत नाही. त्यांच्यासाठी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. हॉस्पिटलने दृष्टिहीन मुलांसाठी प्रशिक्षण द्यावे, तसेच त्यांच्यासाठी कायम वेगवेगळे उपक्रम राबवावेत, असे सांगितले. दृष्टिहीन असणाऱया कोणत्याही मुलाकडे दुर्लक्ष करून नका, असे आवाहन डॉक्टरांनी केले. याप्रसंगी नारायण नेत्रालयाचे रेटिना तज्ञ, डॉ. विणेकर, डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. व्ही. ए. कोठीवाले, डॉ. राजेश पवार, डॉ. महेश कमते, डॉ. श्वेता प्रभू, डॉ. अरविंद तेणगी, डॉ. व्ही. एम. पट्टणशेट्टी, डॉ. पाटील उपस्थित
होते.

Related Stories

हाणामारीत जखमी युवकाचा मृत्यू

Patil_p

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

Amit Kulkarni

तुटवडा असल्याचे सांगून चारपटदराने भाजीपाला विक्री

Patil_p

खानापूर तालुक्मयातील 15 दिव्यांगांना तीनचाकी मोटारसायकलींचे वितरण

Amit Kulkarni

उचगावचे प्रवेशद्वार बनले खड्डय़ांचे आगार

Amit Kulkarni

56 व्या बेळगाव श्री शरीरसौष्टव स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!