Tarun Bharat

केएलई इंजिनिअरिंगमध्ये ‘इंजिनिअर्स डे’ साजरा

बेळगाव /प्रतिनिधी

केएलई डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअर्स डे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बसवराज कटगेरी होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना एमबीए विभागप्रमुख डॉ. डी. जी. कुलकर्णी म्हणाले, विश्वेश्वरय्या यांच्यामुळे इंजिनिअरिंग क्षेत्राचा कायापालट झाला. यामुळे त्यांचे नाव आजही आदराने घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. उदय नाईक यांनी सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचा आढावा घेतला.

प्राचार्य डॉ. बसवराज कटगेरी म्हणाले, डॉ. विश्वेश्वरय्या हे प्रत्येक दिवशी नवीन संशोधन करीत असत. लोकांचे जीवन सुसय्य होण्यासाठी त्यांचे मोठे योगदान करण्याचे त्यांनी सांगितले. सहाना कुलकर्णी यांनी स्वागतगीत सादर केले. साक्षी देवळे व धृव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस. एफ. पाटील यांनी आभार मानले. 

Related Stories

अनगोळच्या स्मशानभूमीची अवस्था दयनीय

Omkar B

विकेंड कर्फ्यू, रस्ते-बाजारपेठांमध्ये सन्नाटा

Patil_p

जिमखाना, आनंद अकादमी, बीएससी संघांची विजयी सलामी

Amit Kulkarni

यंदा आंब्यांची आवक कमी; उत्पादनात घट

Amit Kulkarni

बेळगाव शहरात महावीर जयंती निमित्त शोभायात्रेला उत्साहात प्रारंभ

Tousif Mujawar

तब्बल दहा दिवसानंतर पाणीपुरवठा

mithun mane