Tarun Bharat

केएलई इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिओथेरपीच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे मेळावा

प्रतिनिधी / बेळगाव

केएलई इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिओथेरपीच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे ‘होम कमिंग-बॅक टू युवर रुट्स’ हा मेळावा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे उपस्थित होते. कार्यकारी मंडळाचे चेअरमन डॉ. व्ही. एस. साधुण्णवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले होते.

या कार्यक्रमात संस्थेच्या विकासासाठी ज्यांचे साहाय्य लाभले असे डॉ. एच. बी. राजशेखर, डॉ. बी. बी. पुट्टी, डॉ. पी. सी. स्वेन व एस. बी. देसाई यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे पहिले बातमीपत्र यावेळी प्रकाशित करण्यात आले. यानिमित्त संघटनेने शिक्षणेत्तर कर्मचाऱयांना अर्थसाहाय्य केले. अंतिम परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णपदक जाहीर केले. माजी विद्यार्थी संघटनेचे डॉ. गणेश बी. आर., डॉ. अनिल मुरगोड, डॉ. पीयुषा गुरुदत्त, डॉ. बसवराज मोतीमठ, डॉ. विजय कागे यावेळी उपस्थित होते.

Related Stories

फेडरेशन चषक चेस्टोबॉल स्पर्धेत कर्नाटकला विजेतेपद

Amit Kulkarni

शब्दगंधच्या बैठकीत काव्यवाचन

Amit Kulkarni

जाएन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्यावतीने महापालिका आयुक्तांना निवेदन

Tousif Mujawar

रात्रीच्या प्रवासासाठी एसी बस सुसाट

Patil_p

पोलिसांची मोहीम गतिमान

tarunbharat

सीगन इलेव्हन, लक्ष क्रिकेट क्लब संघ विजयी

Amit Kulkarni