Tarun Bharat

केएलई एमबीएतर्फे मानवतावादी दिन साजरा

प्रतिनिधी /बेळगाव

केएलई डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजीच्या एम. बी. ए. विभागाच्यावतीने जागतिक मानवतावादी दिन साजरा करण्यात आला. टिळकवाडी आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱयांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

विभाग प्रमुख डॉ. डी. जी. कुलकर्णी यावेळी बोलताना म्हणाले, ‘कोरोना प्रतिबंधक लसीकरणात आरोग्य कर्मचाऱयांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हा लहानसा सत्कार असला तरी कर्मचाऱयांची सेवा ही खूप मोठी आहे.’ प्रा. डॉ. बसवराज कटगेरी म्हणाले, कोरोना काळात आशा कार्यकर्त्या, वैद्यकीय कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. यावेळी डॉ. प्रयाग गोखले, प्रा. विभा बांडगी यांच्यासह इतर उपस्थित होते.

Related Stories

कारच्या ठोकरीने सदाशिवनगर येथील तरुण ठार

Amit Kulkarni

कर्नाटकमध्ये रुग्णवाढीचे सत्र सुरूच, शुक्रवारी ५ हजाराहून अधिक बाधित

Archana Banage

बीएमटीसीच्या चार बस परिवहनच्या ताफ्यात

Omkar B

दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्थेतर्फे नाना शंकरशेठ जयंती साजरी

Patil_p

बकरी चोरीप्रकरणाचा पोलिसांकडून छडा

Amit Kulkarni

राणी चन्नम्मा विद्यापीठाचा पदवीदान समारंभ 5 रोजी

Patil_p