Tarun Bharat

केएसआरटीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांची मॅजेस्टिक बस टर्मिनलला भेट; बस सुविधांची केली पाहणी

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी दुपारी मंत्रीमंडळ बैठकीत १४ दिवसांच्या राज्यव्यापी बंदची घोषणा केल्यानंतर बेंगळूरमधील प्रवासी कामगार, विद्यार्थी व कर्मचारी शहरातील मॅजेस्टिक बसस्थानकात दाखल झाले.

दरम्यान कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (केएसआरटीसी) व्यवस्थापकीय संचालक शिवयोगी सी. कलसद यांनी मंगळवारी सकाळी मॅजेस्टिक बस टर्मिनलमध्ये प्रवाशांसाठी असलेल्या बस सुविधांची पाहणी केली. दरम्यान केएसआरटीसीने बेंगळूरहून अनेक ठिकाणी जाण्यासाठी ५०० जादा बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

परिवहन मंत्री लक्ष्मण सावदी म्हणाले की, मंगळवारी शहर टर्मिनलवर जणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असेल अशी अपेक्षा आहे. मंगळवारी तीन राज्य महामंडळांनी सुमारे १२,००० बसेसची व्यवस्था केली आहे. केएसआरटीसीच्या एमडीसमवेत उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री लक्ष्मण सावडी यांनीही परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मॅजेस्टिक बस टर्मिनलला भेट दिली.

Related Stories

बेंगळूर: केएसआरटीसीची बेंगळूर विमानतळापासून म्हैसूरपर्यंत ‘फ्लायबस’ सेवा

Archana Banage

कोरोना: दक्षिणेकडे कर्नाटकात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक

Archana Banage

कर्नाटक: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सक्तीने चाचणी करण्याची गरज: मुख्यमंत्री बोम्माई

Archana Banage

7 आयएएस अधिकाऱयांच्या बदल्या

Amit Kulkarni

१५ ऑगस्टनंतर कठोर उपाययोजना लागू कराव्यात: मंत्री आर. अशोक

Archana Banage

काँग्रेस सदस्यांच्या बहिष्कारात होरट्टींची सभापतीपदी निवड

Patil_p