Tarun Bharat

केएसआरटीसी कर्मचाऱयांना सरकारी नोकरांप्रमाणे वेतन द्या

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

@ प्रतिनिधी/ बेळगाव

कर्नाटक राज्य परिवहन मंडळामध्ये अनेक वर्षांपासून काम करत असताना त्यांना सरकारी नोकरदारांप्रमाणे वेतन नाही. तसेच इतर सुविधा नाहीत. त्यामुळे जीवन जगणे कठीण झाले असून सरकारी नोकरांप्रमाणे सर्व सुविधा लागू कराव्यात, या मागणीसाठी कर्नाटक अनुसूचित जमात आणि वाल्मिकी नोकर संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.

जवळपास 1 लाख 30 हजार कामगार काम करत आहेत. 24 तास हे कर्मचारी सेवा बाजावत असतात. मात्र त्यांना देण्यात येणारे वेतन हे अत्यंत कमी आहे. त्यामध्ये जीवन जगणे कठीण असून सरकारी नोकरांपेक्षाही अधिक वेतन देणे गरजेचे आहे. सरकारी नोकरदारांना केवळ आठ तास काम केल्यानंतर या कर्मचाऱयांच्यापेक्षा तीन ते चार पट अधिक वेतन देण्यात येते.

केवळ राज्यातच नाही तर महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, गोवा, केरळ या राज्यांनाही हे कर्मचारी ये-जा करत असतात. जवळपास 75 लाख प्रवाशांना वर्षभरात प्रवास करण्यास मदत करत असतात. असे असताना या कर्मचाऱयांकडे मात्र साफ दुर्लक्ष होत आहे. तेंव्हा तातडीने एक समिती नेमून होणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी महेश शिगीहळ्ळी यांच्यासह केएसआरटीसी कर्मचाऱयांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Related Stories

रॅपिडकिट संपल्यामुळे पक्षकारांना नाहक त्रास

Patil_p

अनमोड महामार्गाचे काम पुन्हा लांबणीवर

Amit Kulkarni

लोकमान्यतर्फे नवी लोकमान्य सुरक्षा समृद्धी ठेव योजना

Amit Kulkarni

अवघे शहर लखलखले

Amit Kulkarni

माहेश्वरी समाजाचा प्र-वर्गात समावेश करा

Amit Kulkarni

बेळगाव रेल्वेस्थानक होणार हायटेक

Amit Kulkarni