Tarun Bharat

केएसआरटीसी नीरज चोप्राला देणार आजीवन ‘गोल्डन पास’

बेंगळूर/प्रतिनिधी

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा सुरु असून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. सर्वसामान्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत प्रत्येकजण नीरज चोप्राच्या या जबरदस्त कामगिरीमुळे भारावले आहेत. दरम्यान, कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (केएसआरटीसी) ने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला आजीवन गोल्डन पास देण्याची घोषणा केली आहे.

व्यवस्थापकीय संचालक शिवयोगी सी. कलसाद यांनी शनिवारी विजयाचा उत्सव साजरा करताना, त्यांनी नीरज चोप्राला आजीवन गोल्डन पास देण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले की, केएसआरटीसीच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त महामंडळाने प्रथमच एखाद्या खेळाडूला आजीवन सुवर्ण पास देण्याची घोषणा केली आहे.

Related Stories

भारत-चीन सैन्यांत पुन्हा झटापट

datta jadhav

अरविंद केजरीवाल गोव्यात दाखल

Abhijeet Khandekar

येत्या ऑक्टोबरपासून लहान मुलांना देणार Zycov-D लस

Tousif Mujawar

नियोजित उद्दिष्ट पूर्ततेसाठी 28 पर्यंत मुदत

Amit Kulkarni

Heavy Rainfall Live Update: कोल्हापूरसह सातार, रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट ; हवामान खात्याचा इशारा

Abhijeet Khandekar

उदयनराजे भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट ; म्हणाले…

Archana Banage