Tarun Bharat

केएसआरपी पोलीस कॉन्स्टेबलची नैराश्येतून आत्महत्या

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नैराश्याच्या भरात बेंगळूर येथील एका केएसआरपी पोलीस कॉन्स्टेबलने बसमध्येच आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. बेंगळूरच्या इंदिरानगर येथील सी. व्ही. रामण हॉस्पिटलमध्ये या कॉन्स्टेबलला केएसआरपीच्या बसमधून नेण्यात येत होते. वाटेतच सदर कॉन्स्टेबलने बसच्या ग्रीलला लुंगीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. बस हॉस्पिटलला पोहोचली. तेंव्हा ही घटना उघडकीस आली. आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात 142 जणांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

सूर्यवंशीचा संगमेशवर प्रेक्षणीय विजय

Amit Kulkarni

भिडे गुरुजींची उचगावला धावती भेट

Amit Kulkarni

लॉकडाऊनमध्येही बेंगळूरची विमान-रेल्वेसेवा राहणार सुरू

Patil_p

शिक्षक भरतीसाठी समाज विज्ञान विषय सक्तीचा

Amit Kulkarni

पाऊस ओसरला तरीही धास्ती कायम

Patil_p

विधीमंडळ हिवाळी अधिवेशन

Amit Kulkarni