Tarun Bharat

केएसएचे माजी अध्यक्ष सरदार मोमीन यांचे निधन

कोल्हापूरच्या क्रीडाविश्वासाठी पाच दशके योगदान देणारा संघटक काळाच्या पडद्याआड

प्रतिनिधी/कोल्हापूर

लॉन टेनिस सारखा जागतिक पातळीवरील खेळ कोल्हापुरात रूजविण्यासाठी आयुष्य व्यथित केलेले कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे माजी अध्यक्ष सरदार बाबालाल मोमीन (वय 87, रा. अकबर मोहल्ला, सोमवार पेठ) यांचे गुरूवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. तरुणपणी अव्वल क्रिकेटपटू आणि बॅडमिंटनपटू असणाऱया मोमीन यांनी केएसएच्या माध्यमातून कोल्हापूरच्या क्रीडाविश्वाची सेवा केली. त्यांच्या जाण्याने क्रीडाविकासासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटणारा क्रीडा संघटक काळाच्या पडद्याआड गेला आहे.

छत्रपती शाहू स्टेडियम, केएसएएचे कार्यालय आणि सरदार मोमीन हे समिकरण गेली पन्नासहून अधिक वर्षे दृढ झाले होते. शालेय, महाविद्यालयीन जीवनात अव्वल गोलंदाज म्हणून लौकिक संपादन केलेले मोमीन उत्कृष्ट बॅडमिंटनपटूही होते. त्यांनी 1953 पासून कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या माध्यमातून क्रीडाक्षेत्राला वाहून घेतले. साठमारी येथे केएसएचे टेनिस कोर्ट विकसित करण्यात त्यांचा पुढाकार होता. कोल्हापुरात लॉन टेनिस सारखा खेळ रूजविण्याचे काम त्यांनी केले. नवनवीन टेनिसपटू घडावेत यासाठी त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धांचे आयोजन केले. अखिल भारतीय टेनिस असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट टेनिस असोसिएशन यांच्याशी त्यांचा संपर्क होता. टेनिसमधील त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशनने त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.

श्रीमंत शाहू महाराजांचे निकटवर्तीय
केएसएचे पेट्रन इन चीफ श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे निकटवर्तीय म्हणून सरदार मोमीन यांची ओळख होती. शाहू महाराजांचाही त्यांच्यावर विश्वास होता. डी. के. अतितकर यांच्या निधनानंतर केएसएसच्या अध्यक्षपदी मोमीन यांची नियुक्ती करताना त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान महाराजांनी राखला होता. त्यावेळी इतर अनेक बडय़ा व्यक्ती अध्यक्षपदासाठी इच्छुक असताना शाहू महाराजांनी मोमीन यांच्या पारडय़ात आपले वजन टाकले होते.

Related Stories

“ज्यांनी जात काढली त्यांच्याच खांद्यावर राजू शेट्टींना अश्रू ढाळावे लागले”

Archana Banage

संचारबंदी काही अंशी शिथिल झाल्याने पोलिसांनी बॅरीकेटस् हटविले

Archana Banage

फसव्या निर्यातदारांशी संबंधित 56 कस्टम ब्रोकरचे परवाने निलंबित

datta jadhav

सध्याचे मुख्यमंत्री म्हणजे भ्रष्टाचारी माणूस’; आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

Abhijeet Khandekar

नरेश गोयल यांच्या अडचणीत वाढ

Patil_p

ओबीसी राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी युतीचं सरकार यावं लागलं, आता मविआ श्रेयाचं ढोल पिटवेल

Abhijeet Khandekar