Tarun Bharat

केकतवाडी गावास 35 लाख 80 हजार पेयजल योजनेतून मंजूर

Advertisements

वाडी-वस्त्यांच्या विकास कामांना सुरवात. करवीर पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी.

 कसबा बीड /प्रतिनिधी

केकतवाडी तालुका करवीर या गावास राष्‍ट्रीय पेय योजनेतून 35 लाख 80 हजार रुपये मंजूर झाले आहेत. वाडी- वस्त्यांच्या  विकासास सुरुवात झाली  आहे ,असे केकतवाडी ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार समयी करवीर पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी साहेब यांनी सांगितले. या सत्कार समारंभ समयी सरपंच पंढरीनाथ नलवडे यानी या कामासाठी राजेंद्र सूर्यवंशी यांनी प्रयत्न केल्यामुळे यश मिळाले आहे. ते योजनेचे  शिल्पकार आहेत असे गौरवोदगार सरपंच नलवडे याने आपले मनोगतात सांगितले. 

या सत्कारसमारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत संघाचे संचालक सचिन विश्वासराव पाटील हे होते. यावेळी करवीर पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांचा सत्कार कृष्णात ढोक, जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते यांचा सत्कार पांडुरंग खोत, रयत संघाचे संचालक सचिन पाटील यांचा सत्कार आनंदा कळंत्रे, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार पाटील यांचा सत्कार मधुकर नलवडे यांच्या हस्ते करण्यात आला.

केकतवाडी गावास 35 लाख 80 हजार रुपये पेयजल योजनेतून मंजूर झाले आहे, या गोष्टीचा मला आनंद होत आहे. तसेच आमदार पी एन पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून वाडी-वस्त्यांसाठी पन्नास लाख रुपये चा पंतप्रधान सडक योजनेतून रस्त्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आमदार पी एन पाटील साहेब यांच्या मतदारसंघांमध्ये वाडी-वस्त्यांवर विकास कामाची सुरुवात झाली म्हटले तर वावगे होणार नाही,असे मत करवीर पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

या कार्यक्रमांमध्ये रयत संघाचे संचालक  व कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी 721 लोकसंख्या असणाऱ्या या गावाच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे असे मनोगतात सांगितले नंदकुमार पाटील, कृष्णा ढोक आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत पंढरीनाथ नलवडे यांनी आभार कृष्णात ढोक यांनी केले.

Related Stories

कोडोली नळपाणी पुरवठा योजना ताब्यात घेण्यासाठी दबावतंत्र

Archana Banage

आमशी गावात कोरोनाचे २८ रुग्ण ; तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी दिली भेट

Archana Banage

महिलांची स्पेशल बस टॉप गिअरवर; 15 दिवसांत 5500 महिलांनी घेतला लाभ

Abhijeet Khandekar

शेतकऱयांचा गुरुवारी राज्यव्यापी एल्गार!

Archana Banage

अजित पवारांचा ‘फायनान्स’ विषय कच्चा, बुद्धिमान माणसा…; निलेश राणेंचा उपमुख्यमंत्र्यांना टोला

Archana Banage

मराठा आरक्षण: …अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू ; खासदार संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

Archana Banage
error: Content is protected !!