Tarun Bharat

केकेआरचा राजस्थानला जोरदार धक्का

आयपीएल टी-20 स्पर्धा : शुभमन गिल, जलद गोलंदाज जोफ्रा आर्चर चमकले, राजस्थान रॉयल्स हंगामात प्रथमच पराभूत, नागरकोटीचे 2 बळी

वृत्तसंस्था / दुबई

शुभमन गिल (34 चेंडूत 47), मॉर्गन (नाबाद 34) यांची दमदार फलंदाजी व गोलंदाजांच्या भेदक माऱयाच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 37 धावांनी अक्षरशः धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 174 धावांची मजल गाठल्यानंतर केकेआरने राजस्थानला 9 बाद 137 धावांवर रोखून धरले. या लढतीपूर्वी गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या राजस्थानचा या हंगामातील हा पहिला पराभव ठरला.

विजयासाठी 175 धावांचे आव्हान असताना 7 व्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या टॉम करणने 36 चेंडूत सर्वाधिक 54 धावा केल्या. पण, त्यापूर्वी स्टीव्ह स्मिथ (3), संजू सॅमसन (8), उत्थप्पा (2) रियान पराग (1), राहुल तेवातिया (14), श्रेयस गोपाल (5) ठरावीक अंतराने बाद होत राहिले आणि यानंतर राजस्थानचा पराभव ही निव्वळ औपचारिकता होती. केकेआरतर्फे कमलेश नागरकोटीने 13 धावात 2 बळी घेतले.

 प्रारंभी, सलामीवीर शुभमन गिल (34 चेंडूत 47), इयॉन मॉर्गन (23 चेंडूत नाबाद 34) यांच्यासह अन्य फलंदाजांच्या उपयुक्त योगदानानंतर कोलकाता नाईट रायडर्सने 6 बाद 174 धावांपर्यंत मजल मारली. अर्धशतकाच्या उंबरठय़ावर बाद झालेल्या शुभमन गिलच्या खेळीत 5 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला.

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकल्यानंतर कोलकाताला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि त्यांचा हा निर्णय बऱयाच अंशी पथ्यावर पडणारा ठरला. सलामीवीर सुनील नरेन केवळ 15 धावांवर बाद झाला, त्यावेळी संघाच्या खात्यावर 4.5 षटकात 36 धावा होत्या. उनादकटच्या गुडलेंग्थ ऑफकटरने मिडल व लेगस्टम्प उदध्वस्त केल्यानंतर त्याची खेळी संपुष्टात आली. तिसऱया स्थानावरील नितीश राणा (17 चेंडूत 22) व आंद्रे रसेल (14 चेंडूत 24) यांनी उत्तम सुरुवात केली असली तरी त्यांना याचे मोठय़ा खेळीत रुपांतर करता आले नाही.

मागील सामन्यातील फलंदाजीतील हिरो राहुल तेवातियाने नितीश राणाला परतीचा रस्ता दाखवला. तेवातियाच्या गोलंदाजीवर ऑफकडे लाँग ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात नितीश राणाचा अंदाज चुकला.

सलामीवीर शुभमन गिलने एक बाजू लावून धरताना दमदार फटकेबाजीही केली. नंतर अर्धशतकाच्या उंबरठय़ावर असताना तो जोफ्रा आर्चरच्या लेगकटरवर फसत तिसऱया गडय़ाच्या रुपाने तंबूत परतला.

त्याने लेग स्टम्पवरील गुडलेंग्थ चेंडूवर आर्चरकडेच परतीचा झेल दिला. चेंडूने यावेळी बॅटची कड घेतल्यानंतर झेल पूर्ण करण्यासाठी आर्चरला बराच वेळ मिळाला.

केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकने पुन्हा एकदा फलंदाजीत निराशा केली. त्याला केवळ एकाच धावेवर परतावे लागले. दिनेश कार्तिक बचावात्मक पवित्र्याचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चकला. यष्टीमागे जोस बटलरने सहज झेल पूर्ण केला. या सलग पडझडीमुळे 5 बाद 115 अशी स्थिती असताना राजस्थानची मदार अनुभवी इयॉन मॉर्गन व पॅट कमिन्स या विदेशी जोडीवर होती. त्यापैकी, कमिन्सने निराशा केली. त्याने टॉम करणच्या गोलंदाजीवर डीप बॅकवर्ड स्क्वेअरवरील संजू सॅमसनकडे झेल दिला. हा झेल पूर्ण केल्यानंतर सॅमसन डोक्यावर आदळला होता. 

राजस्थानतर्फे आर्चरने 14 धावात 2 तर अंकित रजपूत, उनादकट, टॉम करण व राहुल तेवातिया यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. धावफलक

कोलकाता नाईट रायडर्स : शुभमन गिल झे. व गो. जोफ्रा आर्चर 47 (34 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), सुनील नरेन त्रि. गो. उनादकट 15 (14 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), नितीश राणा झे. पराग, गो. तेवातिया 22 (17 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), आंद्रे रसेल झे. उनादकट, गो. रजपूत 24 (14 चेंडूत 3 षटकार), दिनेश कार्तिक झे. बटलर, गो. आर्चर 1 (3 चेंडू), इयॉन मॉर्गन नाबाद 34 (23 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), पॅट कमिन्स झे. सॅमसन, गो. करण 12 (10 चेंडूत 1 चौकार), कमलेश नागरकोटी नाबाद 8 (5 चेंडूत 1 चौकार). अवांतर 11. एकूण 20 षटकात 6 बाद 174.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-36 (सुनील नरेन, 4.5), 2-82 (नितीश राणा, 9.6), 3-89 (शुभमन, 11.1), 4-106 (दिनेश कार्तिक, 13.1), 5-115 (रसेल, 14.2), 6-149 (कमिन्स, 17.6).

गोलंदाजी : जोफ्रा आर्चर 4-0-18-2, अंकित रजपूत 4-0-39-1, जयदेव उनादकट 4-0-14-1, टॉम करण 4-0-37-1, श्रेयस गोपाल 4-0-43-0, रियान पराग 1-0-14-0, राहुल तेवातिया 1-0-6-1.

राजस्थान रॉयल्स : जोस बटलर झे. वरुण, गो. शिवम मावी 21 (16 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), स्टीव्ह स्मिथ झे. कार्तिक, गो. कमिन्स 3 (7 चेंडू), संजू सॅमसन झे. नरेन, गो. मावी 8 (9 चेंडूत 1 चौकार), रॉबिन उत्थप्पा झे. मावी, गो. नागरकोटी 2 (7 चेंडू), रियान पराग झे. शुभमन, गो. नागरकोटी 1 (6 चेंडू), राहुल तेवातिया त्रि. गो. वरुण 14 (10 चेंडूत 1 षटकार), टॉम करण नाबाद 54 (36 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), श्रेयस गोपाल झे. कार्तिक, गो. नरेन 5 (7 चेंडू), जोफ्रा आर्चर झे. नागरकोटी, गो. वरुण 6 (4 चेंडूत 1 षटकार), जयदेव उनादकट झे. नागरकोटी, गो. कुलदीप 9 (13 चेंडू), अंकित रजपूत नाबाद 7 (5 चेंडूत 1 षटकार). अवांतर 7. एकूण 20 षटकात 9 बाद 137.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-15 (स्टीव्ह स्मिथ, 1.6), 2-30 (सॅमसन, 4.1), 3-39 (बटलर, 6.1), 4-41 (उत्थप्पा, 7.1), 5-42 (रियान पराग, 7.4), 6-66 (तेवातिया, 10.5), 7-81 (श्रेयस गोपाल, 13.5), 8-88 (आर्चर, 14.4), 9-106 (17.6).

गोलंदाजी : सुनील नरेन 4-0-40-1, पॅट कमिन्स 3-0-13-1, शिवम मावी 4-0-20-2, कमलेश नागरकोटी 2-0-13-2, वरुण चक्रवर्ती 4-0-25-2, कुलदीप यादव 3-0-20-1.

Related Stories

अंकित बावणेच्या द्विशतकासह महाराष्ट्राचा धावांचा डोंगर

Patil_p

अभिषेक वर्मा, ज्योती सुरेखा यांना कांस्य

Patil_p

सिडनी थंडर संघाला अजिंक्यपद

Patil_p

कोविशिल्ड, कोवॅक्सिनला 96 देशात मान्यता

datta jadhav

प्रभाग रचनेवरुन राज ठाकरेंचा हल्लाबोल, आता लोकांनीच कोर्टात जाण्याचं केलं आवाहन

Archana Banage

गोविंदांच्या आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण; म्हणाले, वेगळं आरक्षण नसून…

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!