Tarun Bharat

केकेआरविरुद्ध लढतीत दिल्लीसमोर प्ले-ऑफचे लक्ष्य

शारजाह / वृत्तसंस्था

आज (मंगळवार दि. 28) होणाऱया आयपीएल साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ केकेआरविरुद्ध लढतीसाठी मैदानात उतरेल, त्यावेळी त्यांच्यासमोर प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करण्याचे लक्ष्य असणार आहे. केकेआरचा अव्वल खेळाडू आंद्रे रसेल या लढतीत खेळू शकणार का, याबद्दल अनिश्चितता आहे. ही लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता खेळवली जाईल.

सोमवारच्या लढतीपूर्वी दिल्लीचा संघ गुणतालिकेत दुसऱया स्थानी विराजमान होता. दिल्लीने या उर्वरित टप्प्यात आक्रमक क्रिकेट खेळले असून यात सातत्य राखण्याचा त्यांचा येथेही प्रयत्न असेल. दिल्लीने 10 सामन्यात 8 विजयासह 16 गुण वसूल केले आहेत. मागील लढतीत त्यांनी राजस्थान रॉयल्सचा धुव्वा उडवला होता. दोनवेळचे आयपीएल विजेते केकेआरने 4 विजय व 6 पराभव अशी कामगिरी नोंदवली आहे.

केकेआरला मागील लढतीत चेन्नई सुपरकिंग्सने धूळ चारली, त्यावेळी रसेलची त्यांना प्रकर्षाने उणीव जाणवली होती. रसेल धोंडशिरेच्या दुखापतीमुळे मैदानातून बाहेर निघून गेल्यानंतर त्याची उर्वरित 3 षटके करवून घेणे केकेआरसाठी डोकेदुखी ठरले होते. त्याच्या गैरहजेरीत प्रसिद्ध कृष्णाने प्रारंभी उत्तम मारा केला. पण, नंतर जडेजाला रोखण्यात त्याला यश आले नव्हते.

Related Stories

स्पेन-स्वीडन रोमांचक लढत अखेर बरोबरीत

Patil_p

सचिन तेंडुलकरने चाहत्यांना दिल्या संक्रांतीच्या हटके शुभेच्छा, घरच्यांनाही दिलं सरप्राईज

Archana Banage

सर्बिया, स्पेन उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी लांबणीवर

Patil_p

आशिया चषकाचा रणसंग्राम आजपासून

Patil_p

सौराष्ट्रकडून दिल्लीचा डावाने पराभव

Amit Kulkarni