Tarun Bharat

केखले येथे ऊस फड पेटवताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

प्रतिनिधी / वारणानगर

केखले (ता. पन्हाळा) येथील उसाचा फड पेटवताना शेतकरी माणिक शामराव शिंगटे (वय ४२) यांचा होरपोळून जागीच मृत्यू झाला. घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की माणिक शिंगटे हे केखले येथील कुंभारकी नावाच्या वस्तीमध्ये राहत असुन जवळच असलेल्या कारीदगी नावाच्या शेतातील ऊस कारखान्यात गेल्याने त्या शेतातील फड पेटवत असताना अचानक शेजारील दिलीप पाटील यांच्या उभा असलेल्या उसाला आग लागली सदरची आग शिंगटे विजवण्यासाठी गेले असता ते ऊसात अडकून पडल्याने होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

त्यांच्या पाश्चात आई,पत्नी, दोन मुले,असा परिवार आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली असुन पुढील तपास स.पो.नि. दिनेश काशिद करित आहेत.

Related Stories

शालेय विद्यार्थ्यांना मिळताहेत जमा खर्चाचे धडे

Archana Banage

के.एस.ए. कार्यकारिणी मंडळ पदाधिकारी निवडी बिनविरोध

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : शिरोळच्या तीन वर्षीय स्वराने केले इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड

Archana Banage

कोल्हापूर : तारदाळमध्ये युवकाची आत्महत्या

Archana Banage

घडाळ्याचे काटे उलटे फिरवावे लागले तर फिरवावे लागतील पण लोकशाही वाचवावी लागेल; पृथ्वीराज चव्हाण

Abhijeet Khandekar

संत गजानन पॉलिटेक्निकला ‘थ्री’ स्टार रेटिंग’

Abhijeet Khandekar