Tarun Bharat

‘केजरीवाल चंद्र-तारे आणून देण्याच्याही भूलथापा देतील’

आपवर आश्वासनपूर्तीची कोणतीही जबाबदारी नाही : भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची टीका

प्रतिनिधी / पणजी

आम आदमी पक्षाचे सरकार गोव्यात नाही. त्यांचा एकही आमदार सध्या नाही. त्यामुळे कोणत्याही आश्वासन पूर्तीची जबाबदारी त्यांच्यावर येत नाही. यामुळेच मोफत विजच काय चंद्र-तारे आणून देण्याच्या भूलथापा देण्यासाठी ते मोकळे आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी येथे केली आहे.

 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर तानावडे यांनी हा पलटवार केला आहे.

 तानावडे म्हणाले दिल्ली ही दिल्ली आहे आणि गोवा हा गोवा आहे. केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेला थापा मारल्या असतील, मात्र त्या थापा येथे पचणार नाहीत. गोव्यातील जनता त्यांच्या भूलथापांवर विश्वास ठेवणार नाही. जनता त्यांच्यावर किती विश्वास ठेवते हे लवकरच समजणार आहे. आश्वासनपूर्तीची कोणतीही जबाबदारी सध्या नसल्यामुळे ते कोणते आश्वासन देऊ शकतात. भाजपचे येथे सरकार असल्यामुळे दिलेल्या आश्वासनाची लगेच पूर्ती करण्याची जबाबदारी आमच्यावर येते. जनता हे सारे जाणून आहे, असेही ते म्हणाले.

Related Stories

मायकल लोबो वालांकिणीला रवाना

Amit Kulkarni

डिचोलीतील मतदार या निवडणुकीत मंत्र्याला निवडून आणणार

Amit Kulkarni

धालोगीतांचे संकलन ‘गांवकवन’

Amit Kulkarni

म्हादईसाठी आता मगोही आंदोलन करणार

Patil_p

आयआयटी प्रस्तावित जागेतील झाडांची कत्तल

Omkar B

गोमेकॉतील 85 टक्के जागांवर ‘सत्तरीकर’च कसे?

Amit Kulkarni