Tarun Bharat

केजरीवाल मॉडेल हेच गोव्याला पुढे नेणार

Advertisements

आप नेते महादेव नाईक यांचा विश्वास

प्रतिनिधी /पणजी

केजरीवाल मॉडेल हेच गोव्याला पुढे नेऊ शकते. याचबरोबर दिuली शासनचे मॉडेल म्हणजे केजरीवाल यांचे शिक्षण मॉडेल व आरोग्य मॉडेल गोव्यातहि उत्तम प्रशासन आणू शकते. गोमंतकीय आपच्या कार्याकडे आकर्षित झाले असून पक्षाला पाठिंबा देत आहेत. आम आदमी पक्षहि गोमंतकीयांचा आवाज बनत आहे असा विMवास आपचे नेते महादेव नाईक यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार पाfरषदेत व्यक्त केला.

भाजप झोपी गेले असताना कोरोनाच्या काळात फक्त आप गोमंतकीयांच्या पाठीशी उभे राहिले. दुसर्‍या लाटेदरम्यान गावोगावी जाऊन लोकांची ऑक्सिजन पातळी तपासण्यापासून ते ऑक्सिमित्र मोहिमेद्वारे घरोघरी मोफत रेशन पोहचविण्यासाठी आपने श्रम घेतले. केवळ आम आदमी पक्षच गोव्यातील तरूणांच्या समस्या सोडवू शकतो असे महादेव नाईक यांनी यावेळी सांगितले.

सरकारने बेरोजगारीचा विषय गांभीर्याने घेण्याची मागणी गोमंतकीयांनी केली होती. परंतु सरकार राजकीय नाट्यातच व्यस्त आहे. दहा हजार नोकर्‍या देण्याचे आMवासन हे केवळ एक जाहिरात आहे. मतांच्याहेतtने भाजप सरकार आजच्या तरूणांची दिशाभूल करत आहे असा आरोप महादेव नाईक यांनी यावेळी केला. फक्त शिरोडा आणि फोंडाच नाहितर संपूर्ण गोव्यामध्ये आपचा विस्तार होत आहे. पक्षाप्रती गोमंतकीयांचा प्रतिसाद उदंड आहे. महादेव नाईक यांच्या प्रवेशामुळे आणखी लोक पक्षाला पाठिंबा देतील अशी आशा आपचे गोवा निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी यावेळी व्यक्त केली. महादेव नाईक यांच्या प्रवेशामुळे फोंडय़ातील पक्षाचा पाया मजबूत होईल. राजकारणातील त्यांचा 35 वर्षांचा अनुभव आम्हाला आणि पक्षाला बळकट केरल असे आप गोवाचे उपाध्यक्ष सुरेल तिळवे यांनी सांगितले.

Related Stories

ढवळीकर यांनी जनतेचा विश्वास गमावला!

Amit Kulkarni

रेल्वे डबल ट्रेकींगचे काम सुरुच

Amit Kulkarni

दाबोळी विमानतळावरील टॅक्सी चालकाला महामार्गावर मारहाण, चौघांना अटक

Amit Kulkarni

स्मृती इराणी यांना मंत्रिमंडळातून डच्चू द्या

Patil_p

महापौर निवड 30 रोजी शक्य

Patil_p

बेकायदेशीर चिरेखाणींवर दंडात्मक, फौजदारी कारवाईचे संकेत

Amit Kulkarni
error: Content is protected !!