Tarun Bharat

केजरीवाल सरकारकडून भरीव मदत जाहीर

Advertisements

50 हजार रुपयांची मदत- 2500 रुपयांचे पेन्शन- मोफत धान्य मिळणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना महामारीच्या पीडितांसाठी मोठय़ा घोषणा मंगळवारी केल्या आहेत. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत दर महिन्याला 2500 रुपयांची मदत केली जाणार आहे, तसेच या मुलांना मोफत शिक्षण मिळणार आहे. दिल्लीत रेशनकार्ड नसलेल्या लोकांनाही धान्य मिळणार आहे. प्रत्येक गरजूला महिन्याला 10 किलो धान्य मिळणार आहे.

तर आईवडिल दोघांचाही कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मुलांचे शिक्षण दिल्ली सरकार करविणार आहे. तर एकमात्र कमावता व्यक्ती कोरोनामुळे मृत्युमुखी पडला असल्यास संबंधित कुटुंबाला पेन्शन देण्यात येणार आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची भरपाई दिली जाणार आहे.

रेशनकार्ड नसेल तरीही धान्य

दिल्लीत मागील वर्षाप्रमाणेच गरीबांना मोफत धान्य देण्यात येईल. रेशनकार्ड नसलेल्यांनाही मोफत धान्य मिळणार आहे. दिल्लीत 72 लाख  रेशनकार्डधारकांना चालू महिन्यात मोफत धान्य मिळणार असून त्यांच्याकडून पैसे घेतले जाणार नाहीत. केंद्राकडूनही या रेशनकार्डधारकांना 5 किलो धान्य मोफत मिळत आहे. त्यांना या महिन्यात आता 10 किलो धान्य मोफत मिळणार असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Related Stories

आरबीआयकडून केंद्राला 99,122 कोटींची मदत

Patil_p

भारतातील कोरोना रुग्णसंख्या 85 लाखांवर

datta jadhav

जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 1,013 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

भाजप खासदारपुत्राचा समाजवादी पक्षात प्रवेश

Patil_p

KK यांचा मृत्यू की घातपात? …यामुळं वाढलं मृत्यूचं गूढ

datta jadhav

बाटला हाऊस आरोपीस सुनावली फाशी

Patil_p
error: Content is protected !!