Tarun Bharat

केटीआर यांना तेलंगणाचे मुख्यमंत्रिपद?

केसीआर घेणार निर्णयःफेब्रुवारी अखेरपर्यंत होऊ शकते घोषणा

वृत्तसंस्था/ हैदराबाद

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव (केसीआर) लवकरच स्वतःचे पुत्र के.टी. रामाराव (केटीआर) यांना स्वतःचे उत्तराधिकारी करू शकतात. केसीआर फेब्रुवारीमध्ये पुत्र केटीआरला मुख्यमंत्रिपद देणार असल्याचे टीआरएसच्या अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. केसीआर आता राष्ट्रीय राजकारणावर लक्ष केंद्रीत करू इच्छित आहेत. यापूर्वी केसीआर यांनी पुत्राला पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त केले होते. केटीआर यांना पक्ष आणि सरकारमध्ये क्रमांक-2 म्हणून पाहिले जाते.

मुख्यमंत्री केसीआर यांचा ज्योतिषावर प्रचंड विश्वास आहे. केटीआर यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यापूर्वी केसीअरा फेब्रुवारीमध्ये यदाद्री मंदिरात तीन अनुष्ठान करणार आहेत. यदाद्री मंदिरात सुदर्शन यज्ञ, चांदी यज्ञ आणि राजस्यमाला यज्ञाचे आयोजन होणार असल्याचे सांगण्यात येते. याकरता त्यांनी संबंधित अधिकाऱयांना मंदिराचे काम  लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे. लवकरच यासंबंधी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली जाणार असून त्यात तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

हैदराबाद महापालिका निवडणुकीनंतरच केसीआर स्वतःच्या पुत्राला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविणार असल्याचे मानले जात होते, परंतु असे घडले नाही. तेलंगणात आता फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत सत्तेचे हस्तांतरण होऊ शकते. केटीआर यांना नवे मुख्यमंत्री केले जाऊ शकते. केटीआर यांची कार्यशैली, प्रतिबद्धता आणि नेतृत्वगुण आगामी काळात पक्षाला कुशल आणि प्रभावी वाटचाल करण्यास सहाय्यभूत ठरणार असल्याचा दृढ विश्वास मुख्यमंत्री केसीआर यांना असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

केटीआर यांनी सिर्सिला विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला होता. मागील मंत्रिमंडळात ते उद्योग तसेच माहिती-तंत्रज्ञान मंत्री होते. तर पुढील आठवडय़ात त्यांना मंत्रिमंडळात सामील केले जाण्याची शक्यता आहे.

Related Stories

भारतात नेपाळमधून होतेय पेट्रोलची तस्करी

datta jadhav

वर्षअखेरपर्यंत येणार भारतीय लस

Patil_p

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त पीएम मोदींचे मराठीतून ट्वीट, म्हणाले…

Archana Banage

जगातील सर्वात भीतीदायक जंगल

Patil_p

फारुख अब्दुल्लांची ईडीकडून चौकशी

Patil_p

राहुल गांधींचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

Patil_p