Tarun Bharat

केट विंसलेटच्या अभिनयाची कमाल

जगभरात होतेय वेब सीरिजची प्रशंसा

एचबीओने अलिकडेच मेर ऑफ इस्टटाउन ही वेबसीरिज प्रदर्शित केली आहे. ही वेबसीरिज भारतात हॉटस्टारवर उपलब्ध आहे. केट विंसलेटने या शोमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. 7 एपिसोडची ही वेबसीरिज सद्यकाळातील सर्वोत्तम शोंपैकी एक मानली जात असून जगभरात याचे कौतुक होत आहे.

ही वेबसीरिज एक मर्डर मिस्ट्री असून पोलीस तपासाभोवती याचे कथानक गुंफण्यात आले आहे. अमेरिकेच्या फिलाडेल्फियामधील पोलीस अधिकार मेर शीहान (केट) एका मुलीच्या हत्येचे गूढ उकलू पाहत असताना परिसरात आणखीन तीन मुली गायब होत असल्याचे दाखविण्यात आले आहे. जुलियानेने सहाय्यक भूमिका उत्तमप्रकारे साकारली आहे.

7 एपिसोडची ही वेबसीरिज पूर्णपणे केटभोवतीच साकारण्यात आली आहे. मुख्य व्यक्तिरेखेत केटने जीव ओतला असल्याचे बोलले जात आहे. अमेरिका, ब्रिटन, युरोप सर्वत्र या शोचे कौतुक होत आहे. दिग्दर्शन आणि सिनेमेटोग्राफी  हे या शोचे सर्वात मोठे वैशिष्टय़ आहे.

Related Stories

‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर प्रदर्शित

Patil_p

शबाना आझमी यांच्या कारचालकावर गुन्हा दाखल

Archana Banage

चांगले काम सुरू ठेवण्याची इच्छा

Patil_p

‘सिटाडेल’चा ट्रेलर प्रदर्शित प्रियांका चोप्राची नवी वेबसीरिज

Patil_p

अलोक राजवाडे घेऊन येतोय ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’

prashant_c

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Tousif Mujawar