Tarun Bharat

केन रिचर्डसनची माघार अँड्रय़ू टायची निवड

सिडनी : भारताविरुद्ध होणाऱया वनडे व टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने केन रिचर्डसनच्या जागी वेगवान गोलंदाज अँड्रय़ू टायची निवड केली आहे. कोरोना महामारीच्या काळात कुटुंबीयांसमवेत राहता यावे यासाठी रिचर्डसनने या दौऱयातून माघार घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पत्नी व नुकत्याच जन्मलेल्या मुलासमवेत राहता यावे यासाठी रिचर्डसनने या मालिकेतून माघार घेत असल्याचा निर्णय निवड समितीला कळविला. त्याने घेतलेला निर्णय कठीण होता. पण संपूर्ण संघ व निवड समितीने त्याच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे, असे निवड समिती सदस्य टेव्हर हॉन्स यांनी सांगितल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवेदनाद्वारे सांगितले. ‘केनला पत्नी नायकी व मुलासमवेत ऍडलेडमध्येच राहण्याची इच्छा होती. आम्ही नेहमीच खेळाडूंना व त्यांच्या कुटुंबियांना पाठिंबा देत असतो आणि सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत तर ते अत्यंत आवश्यक आहे,’ असे हॉन्स म्हणाले.

ऍडलेडमध्ये कोव्हिड 19चा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे रिचर्डसनने माघारीचा निर्णय घेतला असावा, असे मानले जात आहे. या उद्रेकामुळे दक्षिण ऑस्ट्रेलियातील स्थितीवर तसेच सीमाबंदीमुळे देशभरात घालण्यात आलेल्या निर्बंधावर लक्ष ठेवून असल्याचे सीएचे हंगामी प्रमुख कार्यकारी निक हॉकली यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते.        

Related Stories

रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याखाली सापडला युवतीचा मृतदेह

Patil_p

भारतीय महिलांची सलामी पाकिस्तानशी

Amit Kulkarni

महिला क्रिकेटपटू वनिताची निवृत्ती जाहीर

Patil_p

जसप्रित बुमराहचे शुभमंगल लवकरच…

Patil_p

2020 मधील बॅलन डी ओर पुरस्कार रद्द

Patil_p

भारतीयानी मोदींच्या सल्ल्याचा गंभीरपणे विचार करावा : पनेसर

Omkar B