Tarun Bharat

केपीटीसीएल कार्यालय परिसरातील रस्त्याला अखेर मुहूर्त

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

नेहरू नगर येथील केपीटीसीएल कार्यालयात जाणारा अंतर्गत मार्ग खराब झाला होता. यामुळे हेस्कॉम तसेच केपीटीसीएल कार्यालयात जाणाऱया नागरिक व प्रवाशांना याचा फटका बसत होता. त्यामुळे हा मार्ग करण्याची मागणी केली जात होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली असून, या रस्याच्या कामाला मुहूर्त मिळाला आहे.

केएलई रोडपासून ते कार्यालयापर्यंतच्या मार्गावर पावसाळय़ात खड्डे पडले होते. या परिसरात असणारे हेस्कॉमचे शहर उपविभाग 3, ग्रामीण उपविभाग 1 या कार्यालयात दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असते. परंतु पावसाळय़ातील खड्डय़ांमुळे चिखलातून प्रवास करावा लागत होता. तात्पुरत्या स्वरूपात माती व खडी टाकण्यात आली होती. तरी देखील प्रवाशांना अनेक समस्या जाणवत होत्या. त्यामुळे हा मार्ग करण्याची मागणी होत होती.

आठ दिवसांपूर्वी अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचा मुहुर्त सापडला आहे. डांबरीकरण करण्यात आल्यामुळे आता वाहने येण्या जाण्यास सोयिचे ठरणार आहे. यामुळे प्रवासी तसेच कर्मचाऱयांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Stories

बुद्धिबळ स्पर्धेत अनिरूद्ध दासरी प्रथम

Amit Kulkarni

चित्र समजून घेण्यासाठी जाणीव महत्त्वाची

Patil_p

कारवार बसस्थानकात उद्घाटनापूर्वीच समस्या

Amit Kulkarni

दारुच्या नशेत गवतगंजीला आग

Amit Kulkarni

निपाणी तालुक्याचा राज्यात कर्तृत्वाचा झेंडा

Patil_p

ऋतुजा-दीपिकाच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

Amit Kulkarni
error: Content is protected !!