Tarun Bharat

केपेतील साप्ताहिक बाजार आजपासून तात्पुरता बंद

कोरोनाचे वाढते रुग्ण तसेच लोकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पालिकेचा निर्णय

वार्ताहर / केपे

राज्यात कोरोना विषाणूचे वाढते रुग्ण व बाजार भागात लोकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन यावर उपाययोजना म्हणून केपे पालिकेने केपे येथे रविवारी भरणारा साप्ताहिक बाजार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्थानिक लोकांनी समर्थनही  केले आहे.

राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाऊन असून सुरुवातीच्या काळात फक्त जीवनावश्यक वस्तूच बाजारात उपलब्ध होत्या. मात्र राज्य कोरोनामुक्त झाल्याने राज्य सरकारने हळूहळू बाजारपेठ सुरू केली होती. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे सरकारने घालून दिलेले नियम, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे हे पाळणे गरजेचे बनले आहे. मात्र अनेक लोकांकडून त्याचे उल्लंघन होताना दिसत आहे.

केपे पालिका क्षेत्रातील मुख्य साप्ताहिक बाजार हा रविवारी भरत असतो. या बाजारात केपेच्या बाहेरचे विक्रेते येते असतात. त्यांच्यामुळे अधिक गर्दी पाहायला मिळत असते. मागच्या रविवारी तर या बाजारात खूप गर्दी उसळली होती आणि त्यावर प्रशासनाला नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते. तसेच बाजारात बाहेरून येणाऱया विक्रेत्यांची दादागिरी चालत असते. पालिकेच्या कर्मचाऱयांनाही त्याचा अनुभव घ्यावा लागलेला आहे.

पुढील आदेशापर्यंत साप्ताहिक बाजार बंद

बाहेरून येणाऱया विक्रेत्यांचा व्याप तसेच केपेबरोबर अन्य भागांतील लोकांची रविवारच्या बाजारात खरेदी करण्याकरिता होणारी गर्दी विचारात घेऊन व राज्यात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता आजच्या रविवारपासून साप्ताहिक बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र बाजारपेठेतील दुकाने नेहमीप्रमाणे सुरू असतील. पुढचा आदेश पालिका देत नाही तोपर्यंत केपेतील रविवारचा साप्ताहिक बाजार बंदच राहील, असे कळविण्यात आले आहे.

बाजारात लोटणारी गर्दी पाहून निर्णय : नाईक

यासंबंधी केपे पालिकेचे नगराध्यक्ष दयेश नाईक यांनी सांगितले की, राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन असून त्यात पुन्हा रुग्ण सापडू लागले आहेत. तसेच रविवारच्या बाजारात होणारी गर्दी पाहता हा बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय लोकांच्या हिताकरिता घेतलेला आहे.

Related Stories

दिवसेंदिवस वाढतोय कोरोनाचा विळखा

Omkar B

गुरप्रीतच्या गोलरक्षणाने चेन्नईनचा विजय हुकला

Amit Kulkarni

सत्ताधारी, उद्योजकांकडून स्वागत, विरोधकांची टीकाच!

Amit Kulkarni

12 दिवसांत खास 18 हवाई सेवांव्दारे 2994 पर्यटक मायदेशी रवाना

Omkar B

वादानंतर सागरी कासव महोत्सवाचे उद्घाटन

Patil_p

डॉ.सावंत मंत्रीमंडळात फोंडा तालुका ठरला ‘किंगमेकर’; सुदिन आऊट

Amit Kulkarni