Tarun Bharat

केपेतील 200 शेतकऱयांनी पाहिला पंतप्रधान मोदींचा संवाद

उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांचा सहभाग, केपे नगरपालिका सभागृहात खास व्यवस्था

वार्ताहर / केपे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे निमित्त साधून शुक्रवारी देशातील 8 कोटी शेतकरी, जे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे लाभार्थी आहेत, त्यांना प्रत्येकी 2000 हजार रुपयांचा एक हप्ता वितरित केला. यापैकी 9664 हे गोव्यातील शेतकरी आहेत. यावेळी देशभरातल्या विविध शेतकऱयांशी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून थेट संवाद साधला. हा कार्यक्रम गोव्यात प्रत्येक तालुक्मयाच्या मुख्य ठिकाणी दाखवण्यात आला. कृषिखाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर हे सुमारे 200 शेतकऱयांच्या समवेत या सोहळय़ात केपे नगरपालिका सभागृहात उभारलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स व्यवस्थेद्वारे सहभागी झाले.

यावेळी नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्य खोलचे शाणू वेळीप, बार्सेचे खुशाली वेळीप, गिरदोलीच्या संजना वेळीप आणि शेल्डेचे सिद्धार्थ गावस देसाई तसेच बाळ्ळीच्या सरपंच दिपाली फळदेसाई, आंबावलीच्या सरपंच जासिंता डायस, असोल्डा सरपंच लता राऊत देसाई, भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर, कृषी खात्याचे अधिकारी शिवराम नाईक गावकर, संदेश राऊत देसाई, केपे भाजप मंडळ अध्यक्ष संजय वेळीप व कुडचडे मंडळ अध्यक्ष विश्वास सावंत, केपे मंडळ सरचिटणीस प्रसाद फळदेसाई व खुशाली वेळीप, कृष्णा वेळीप, सुभाष खराडे, बाळ्ळीच्या उपसरपंच वंदना गावकर, महिला मोर्चाच्या रंजिता पै, सुचिता शिरवईकर, सावित्री कवळेकर, शीतल नाईक, मेदिनी नाईक, कुडचडे महिला मोर्चाच्या रजनी नाईक, डॉ. स्नेहा भागवत आणि केपे भागातील शेतकरी उपस्थित होते.

देश आत्मनिर्भर होण्याच्या मार्गावर : कवळेकर

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी पंतप्रधान मोदी यांचे या योजनेसाठी व वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शेतकऱयांशी थेट संवाद साधल्याबद्दल आभार मानले. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे धोरण देशाला स्वतःच्या पायावर उभे करण्याचे व भारताला एक अर्थव्यवस्था म्हणून सक्षम करण्याचे होते. त्यांच्या या धोरणाचा अवलंब करून आज देश आत्मनिर्भर होण्याच्या मार्गावर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. वाजपेयी यांनी विरोधी पक्षनेते असताना सुद्धा भारताचे प्रतिनिधीत्व संयुक्त राष्ट्रसंघात केले होते याची आठवण त्यांनी करून दिली. यावेळी भाजप मंडळाच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांनी वाजपेयींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

कृषी कायद्यांना दलालांकडून विरोध

केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांच्या समर्थनात बोलताना उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी या कृषी कायद्यांना दलालांकडून विरोध होत असल्याचे मत व्यक्त केले. तसेच हे लोक एका राज्यात राजकीय फायद्यासाठी शेतकऱयांच्या बाजूने बोलतात तर दुसरीकडे जाऊन दुसरेच बोलतात या पंतप्रधानांच्या विधानाचे त्यांनी समर्थन केले. राज्यातील जनतेला भाजप सरकारच पाहिजे हे परत एकदा जिल्हा पंचायत निवडणुकांतून समोर आल्याचे ते म्हणाले. भाजप म्हणजे विकास असून शेतकरी हा देशाच्या विकासाचा पाया आहे. शेतकरी उत्पादक कंपन्याना सरकार प्रोत्साहन देत आहे. या कंपन्या शेतकऱयांनी शेतकऱयांसाठीच चालवायच्या असतात. या कंपन्या शेतकऱयांच्या पिकाला योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी कार्य करतील आणि राज्यातील प्रत्येक तालुक्मयात एक अशा प्रकारे उभारल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

युक्रेनमधून गोव्याची विद्यार्थिनी रुपल गोसावी पोचली गोव्यात

Amit Kulkarni

डिचोली तालुक्यातील आतापर्यंत 4 उमेदवार बिनविरोध

Amit Kulkarni

पाटवळ सत्तरी ट्रक व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

Amit Kulkarni

म्हादईसाठी 26 रोजी खांडेपार येथे कलश मिरवणूक

Patil_p

महागाईच्या खाईत लोटणाऱ्या भाजपला लोकसभेत अद्दल घडवा

Omkar B

सरकारी कर्मचाऱयांसाठी बायोमेट्रिक हजेरी 15 मे पर्यंत स्थगित

Amit Kulkarni