Tarun Bharat

केपे, कळंगुट येथे 1.2 लाखाचा गांजा जप्त

प्रतिनिधी/ पणजी

 गोवा पोलिस खात्याने उत्तर व दक्षिण गोव्यात दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत 1 लाख 20 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून तीन संशयितांना अटक केली आहे. संशयितांमध्ये दोन हैद्राबाद येथील तर एक संशयित स्थानिक असून त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे.

गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केपे येथे एका घरावर छापा मारून 40 हजार रुपये किमंतीचा गाजा जप्त केला आहे. त्यात संशयित व्हॅली डिकॉस्ता याला अटक केली आहे. संशयित ड्रग्सची विक्री करीत असल्याची माहिती सीआयडी पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार सीआयडी पोलिसांनी संशयिताच्या घरावर छापा मारून संशयिताच्या घरातून 40 हजार रुपयांचा गांजा जप्त केला असून संशयिताला रंगेहाथ अटक केली आहे.

दुसऱया एका कारवाईत कळंगुट पोलिसांनी बागा येथे केलेल्या कारवाईत 80 हजार रुपये किमंतीचा गांजा जप्त केला असून दोन संशयितांना अटक केली आहे. विनय कुमार व चैतन्य कोंडुरी (दोघेही हैद्राबाद येथील) यांचा समावेश आहे. दोन्ही संशयित संशयास्पतरित्या बागा समुद्रकिनाऱयावर फिरत होते. गस्तीला असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांच्या स्कूटरच्या डिकीमध्ये गांजा सापडला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पर्यटन व्यवसाय बंद असला तरी कळंगुट परिसरात ड्रग्स प्रकरणे मोठय़ाप्रमाणात सुरु असल्याचे दिसून येत आहे. कळंगुट पोलिसांनी गेल्या दहा महिन्यात 14 तक्रारींची नोंद केली आहे. त्याशिवाय गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस व अमली पदार्थ विरोधी विभागाचे पोलीसही कारवाई करीत असतात. एकूणच पोलिसांच्या कारवाया सुरु असल्या तरी कळंगुट परिसरात ड्रग्जची चलती सुरुच असल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

केपे पालिकेतील भाजपचे 9 नगरसेवक एकसंध

Amit Kulkarni

कविवर्य रामाणी यांची कविता लौकिक अनुभवातून

Amit Kulkarni

भाजीच्या वाहनांवर मोले चेकनाक्यावर बंदी घालावी

Omkar B

बेतोडा योगाश्रमात आजपासून रामचरितमानस कथा निरुपण

Patil_p

अकरा आमदारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची

Amit Kulkarni

उपजिल्हाधिकारी, मामलेदार कार्यालयांतील कर्मचाऱयांना लस

Amit Kulkarni