Tarun Bharat

केपे पालिकेतील भाजपचे 9 नगरसेवक एकसंध

पत्रकार परिषदेत माहिती,विरोधकांकडून दिशाभूल,एल्टन डिकॉस्ता यांनी केपेवासियांची माफी मागावीःदयेश नाईक

वार्ताहर /केपे

निवडणुका जवळ येत असल्याने विरोधकांकडून लोकांची दिशाभूल केली जात असून ते अत्यंत चुकीचे आहे. याकरिता एल्टन डिकॉस्ता यांनी केपेवासियांची माफी मागावी.  कवळेकर यांचे समर्थक भाजपचे 9 नगरसेवक असून ते सर्व एकत्र आहेत, तर काँग्रेसचे तीन व एक स्वतंत्र नगरसेवक आहे, असे माजी नगराध्यक्ष व विद्यमान  नगरसेवक दयेश नाईक यांनी केपे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

यावेळी केपे नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर, उपनगराध्यक्ष विल्यम फर्नांडिस, नगरसेवक फिलू डिकॉस्ता, चेतन हळदणकर, प्रसाद फळदेसाई, अमोल काणेकर, गणपत मोडक, दिपाली नाईक यांची उपस्थिती होती. भाजपचे 5, स्वतंत्र 4 व काँग्रेसचे 4 नगरसेवक असल्याचा विरोधकांकडून जो दावा केला जात आहे तो चुकीचा आहे. कवळेकर समर्थक भाजपचे 9 नगरसेवक असून ते एकत्र आहेत, असे नाईक यांनी सांगितले.

तसेच एल्टन डिकॉस्ता हे स्वतःला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणवत आहेत. गेल्या वीस वर्षांत त्यांनी काँग्रेस व कवळेकर यांच्याकरिता किती काम केले. आपण, मोडक, फिलू डिकॉस्ता यांनी विविध समित्यांवर, युवक काँग्रेसमध्ये काम केले आहे. एल्टन यांनी काँग्रेसकरिता कधीच काम केलेले नाही. तसेच केपेत गेल्या एका वर्षात खूप कामे केली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसे असेल, तर त्यांनी केलेली कामे दाखवावीत. त्यांनी केपेत फक्त एक खासगी इमारत बांधली असून त्यात काँग्रेसचे कार्यालय सुरू केले आहे इतकेच, असे नाईक पुढे म्हणाले.

मात्र कवळेकर यांच्या सहकार्याने तिळामळ येथे मार्केट, क्रीडा संकुल, 30 खाटांचे इस्पितळ, कुशावतीवर समांतर पूल, केपे मार्केट यांची उभारणी करण्यात आलेली आहे. तसेच पोलीस स्टेशन, बस स्टँड, कृषी भवन व इतर अनेक प्रकल्प उभारायचे आहेत, असे नाईक यांनी सागितले. तर नगराध्यक्षा शिरवईकर यांनी केपे पालिकेकडून जी विकासकामे चालू आहेत त्याविषयी माहिती दिली.

Related Stories

घरासमोर ठेवलेल्या दोन वाहनांना आग, 17 लाखांचे नुकसान

Omkar B

लोकमान्य सोसायटीच्या वास्को शाखेचा वर्धापनदिन साजरा

Patil_p

सासष्टीत बहुतांश मतदारसंघात भाजप विजयी होणार

Amit Kulkarni

सांखळी मतदारसंघात मान्सून पूर्व कामांना प्रारंभ

Amit Kulkarni

शिरसई तळय़ाजवळ टुरिर-ट टॅक्सी जळून खाक.

Amit Kulkarni

सावर्डे भाजपातर्फे कुळे, मोलेतील मान्यवरांचा सन्मान

Amit Kulkarni