Tarun Bharat

केपे पालिकेत काल 30 उमेदवारी अर्ज

वार्ताहर / केपे

केपे पालिका निवडणुकी करता काल सोमवारी एकूण तीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून आता पर्यंत केपे पालिकेत उमेदवारी अर्ज केलेल्याची संख्या 46 वर पोचली आहे. केपे पालिकेत अद्याप आणखीन उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता असून उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता देखील कमी झालेली आहे.

केपे पालिकेतील माजी नगराध्यक्ष दयेश नाईक, केपे काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष मान्युएल कुलासो, माजी नगरसेवकी दिपाली नाईक, माजी नगरसेवक कामिलो सिमोईस  याच्या सोबत अनेक नवीन उमेदवारीनी अर्ज दाखल केले आहेत. तर माजी मंत्री प्रकाश शंकर वेळीप याची कन्या श्रेया वेळीप हिने प्रभाग 9 मधून आपला अर्ज दाखल केल्याने वेळीप हे पुन्हा पालिका राजकारणात सक्रिय होत आहेत.

 उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांचे खंदे सर्मर्थक माजी नगराध्यक्ष दयेश नाईक, दिपाली नाईक यानी अर्ज केले आहेत. त्या बरोबर गणपत मोडक व इतरांनी कवळेकर गटातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसचे मान्युएल कुलासो, चेतन नाईक व इतर नवीन उमेदवारानी अर्ज दाखल केले आहेत. पालिका निवडणुकीसाठी ‘आप’ पक्ष ही सक्रिय झाला असून आपच्या ही उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केले आहे.

यामुळे यंदा उमेदवारांची संख्या बरीच वाढण्याची चिन्हे असून प्रत्येक प्रभागातून किमान तीन-चार  उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्मयता आहे तर काही प्रभागातून उमेदवारांची संख्या बरीच वाढणार आहे. मागच्या वेळी तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्या उमेदवारांच्या प्रभागातून आता उमेदवारी दाखल केल्याने बिनविरोध निवडून येण्याची शक्मयता बरीच कमी झ्ा़ाली आहे. यात चेतन नाईक याचा प्रभाग ही राखीव झाल्याने त्याने दयेश नाईक याच्या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पक्षीय पातळीवर जरी निवडणूक लढवली जात नसली तरीही उमेदवारांना पक्ष व नेते समर्थन देत असल्याने भाजप व काँग्रेस याच्यात काही प्रभागातून लढत बरीच रंगतदार होणार आहे. तर राखीवतेमुळे माजी नगराध्यक्ष राहूल पेरेरा मात्र अजून दुसऱया प्रभागातून निवडणूक लढवणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही. राहूल परेरा प्रभाग 2 मधून निवडणूक लढवले किंवा ते पालिका निवडणुकीतून माघार घेऊ शकतात.

Related Stories

बामणभाटी आगरानजीक शेतात पाणी साचल्याने नागरिकांची कुचंबणा

Omkar B

सांखळी उपनगराध्यक्षपदी ज्योती ब्लेगन

Amit Kulkarni

सावित्री ब्लास्टर्स, मॅन्शन चॅलेंजर्स, महेश युनायटेडचे विजय

Amit Kulkarni

दुय्यम खनिज काढण्याच्या नियमात दुरुस्ती

Patil_p

विशिष्ट खुणांची बोली सांकेतिक भाषा

GAURESH SATTARKAR

मडगावातील भाजपचे कार्यकर्ते एकसंघ

Amit Kulkarni