Tarun Bharat

केपे बाजार प्रकल्पाचे अपुर्णावस्थेतच उद्घाटन

माजी नगराध्यक्ष राऊल परेरा यांचा आरोप

प्रतिनिधी/ पणजी

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांना श्रेय घेता यावे यासाठी भाजप सरकारने केपे येथील पालिका बाजाराचे अपुर्णावस्थेच उद्घाटन केले असा आरोप आम आदमी पक्षाचे सहसचिव तथा केपेचे माजी नगराध्यक्ष राऊल परेरा यांनी केला आहे.

केपे मार्केट कॉम्प्लेक्स पूर्ण करण्यासाठी आपण माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडून आर्थिक मंजुरी मागितली होती. एरव्ही केपेतील लोकांच्या भल्यासाठी काम न करणारे उपमुख्यमंत्री आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर माझ्या कामगिरीचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करत आहेत, असे परेरा म्हणाले.

इमारत जीर्णावस्थेत असताना व्यापाऱयांचे स्थलांतर करण्यासाठी आपण पुढाकार घेतला. त्यावेळी उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी मला मदत केली नाही. त्यामुळे दुसऱया मंत्र्याच्या मदतीने आपण त्यांचे पुनर्वसन केले होते, असे परेरा पुढे म्हणाले. आता इमारत अद्याप पूर्ण झालेली नसतानाच उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी तिचे उद्घाटन केले आहे, असा दावा परेरा यांनी केला आहे.

केपेत विकासकामे करण्यात अयशस्वी ठरल्यामुळे ते पुन्हा निवडून येण्याची शक्मयता नाही. म्हणूनच त्यांनी इतक्मया लवकर इमारतीचे उद्घाटन केले. त्यामुळे आता त्यांनी विपेत्यांचे पुनर्वसन करावे, असे आव्हान परेरा यांनी दिले. त्याचबरोबर ’आप’ने सत्ता मिळविल्यास विपेत्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी आम्ही घेऊ, असेही परेरा पुढे म्हणाले.

Related Stories

मडगावात बहरतोय गावठी आंब्यांचा बाजार

Amit Kulkarni

मांद्रे नाईकवाडा सरकारी प्राथमिक शाळेत ऑनलाईन स्पर्धा

Patil_p

पिळर्ण येथील घटनेबाबत राज्यपाल पिल्लई गंभीर

Amit Kulkarni

बारा आमदार अपात्रता याचिकेवर निवाडा आज

Amit Kulkarni

पणजीकरांनी मनपाचे थकविले 35 कोटी!

Omkar B

वीज बिलांवरील वाढीव शुल्क सरकारने भरावे

Patil_p
error: Content is protected !!