Tarun Bharat

केम्मनकोल येथे 37 किलो गांजा जप्त

प्रतिनिधी/ बेळगाव

केम्मनकोल (ता. गोकाक) येथे उसाच्या मळय़ात गांजा पिकविणाऱया शेतकऱयाला अटक करण्यात आली आहे. सोमवारी कुलगोड पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याच्या जवळून 37 किलो कच्चा गांजा जप्त करण्यात आला आहे.

रामाप्पा कल्लाप्पा कल्लोळी (वय 30, मूळचा रा. हडगीनाळ, सध्या रा. केम्मनकोल) असे त्याचे नाव आहे. जप्त कच्च्या गांजाची किंमत 55 हजार 500 रुपयांइतकी होते. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

रामाप्पाने उसाच्या मळय़ात गांजा पिकविल्याची माहिती मिळताच कुलगोडचे पोलीस उपनिरीक्षक एच. के. नरळी व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून गांजाची झाडे जप्त केली. रामाप्पावर अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. 

Related Stories

दुचाकी अडविल्याच्या रागातून पोलिसांवर हल्ला

Amit Kulkarni

व्हीटीयूचा पदवीदान समारंभ 3 एप्रिलला

Amit Kulkarni

लोकोळी येथील मराठी शाळेच्या दोन वर्गखोल्या कोसळल्या

Amit Kulkarni

अंगणवाडी पोषक आहाराला भ्रष्टाचाराची कीड

Omkar B

वाङ्मय चर्चा मंडळातर्फे साहित्य पुरस्कार

Patil_p

नेज येथील 14.32 एकर ऊस आगीत खाक

Patil_p