Tarun Bharat

केरळच्या निराधाराला जीवनदीप

पुन्हा लॉकडाऊन की सीलडाऊन आज होणार निर्णय,

बेळगाव/ प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या धास्तीने शहर आणि परिसरात थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच काही भागातून आलेल्या व्यक्तींचा संचारदेखील संशयास्पद ठरतो आहे.

  येथील डॉ. एस. पी. एम. रोडवरील रेणुका हॉटेलनजीक केरळमधून आलेल्या एका युवकाला सामाजिक कार्यकर्त्यांनी निराधार फिरताना पाहिले. तसेच त्याची चौकशी केली. त्याला मल्याळम आणि तमिळ या दोनच भाषा बोलता येत होत्या. आपल्याला भूक लागली असल्याचे त्याने हातवारे करून सांगितले. मानवाधिकार समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी त्याला अल्पोपाहार दिला. वैद्यकीय मदतीची गरज असल्याचे पाहून कार्यकर्त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय चाचणीसाठी त्याची हॉस्पिटलमध्ये रवानगी करण्यात आली.

 यावेळी जीवनदीप फौंडेशनचे सदस्य व माजी नगरसेवक किरण परब, राजू वर्पे, सुनील बोकडे, सूरज गवळी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मानवाधिकर समितीच्या कार्यकर्त्या मिलन पवार, शालन पाटील, रेश्मा कणबर्गी, प्रणाली पवार आदींनी यासाठी सहकार्य केले.

Related Stories

ग्राम पंचायत निवडणुकीत विविध निर्बंध

Patil_p

शिंदोळी ग्रामस्थांतर्फे सुवर्णसिंहासनासाठी 1 लाखाचा कर्तव्यनिधी

Amit Kulkarni

आज रात्री बारापासून वीज कर्मचारी 72 तासाच्या संपावर

Patil_p

सकाळच्या सत्रात पुन्हा पावसाला जोर

Patil_p

वकिलांसमोरही कोरोनाची मोठी समस्याच

Patil_p

अनशी घाटातील मार्ग वाहतुकीस खुला करा

Amit Kulkarni