Tarun Bharat

केरळच्या बजेटकॉपीवर गांधीहत्येचे छायाचित्र

ऑनलाईन टीम / तिरुअनंतपुरम : 

केरळ विधानसभेच्या 2020-21 च्या अर्थसंकल्पातील कॉपीवर गांधी हत्येचा फोटो छापण्यात आला आहे. केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी या कृतीचे समर्थन केले आहे. गांधींची हत्या आम्ही विसरलो नाही. गांधींचा मारेकरी कोण होता, हे दाखवून देण्यासाठीच हे चित्र छापण्यात आले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

माझ्या बजेट भाषणाच्या कॉपीचे कव्हर मल्याळम् चित्रकाराने तयार केले आहे. त्याने गांधी हत्येचा प्रसंग या चित्रातून रेखाटला आहे. यातून गांधीजींची हत्या कोणी केली, हे आम्ही अजूनही विसरलो नसल्याचे दाखवून द्यायचे आहे. गांधींचा मारेकरी कोण होता, हे दाखवून देण्यासाठीच हे चित्र छापण्यात आल्याचे थॉमस इसाक यांनी सांगितले. जेव्हा इतिहास नव्याने लिहिला जातो, तेव्हा असे करणे फार महत्त्वाचे असते. काही ऐतिहासिक आठवणी, घटना पुसण्याचे काम सुरू आहे. एनआरसीच्या नावाने देशात धार्मिक तणाव निर्माण केला जात आहे. अशा काळात केरळ देशात एकत्मतेचे उदाहरण घालून देईल, असेही इसाक यांनी सांगितले.

इसाक यांनी बजेट भाषणाची सुरुवातच सीएए आणि एनआरसीच्या मुद्यावरून केली होती.

Related Stories

वडिलांकडून लॉकडाउनचा भंग, मुलाची तक्रार

Patil_p

भारतीय सैन्याकडून काश्मिरी लघुपट प्रसारित

Omkar B

शरद यादव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Patil_p

एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी यांचे निधन

Tousif Mujawar

अमित शाह, योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका

datta jadhav

गुजरात : रुळावर उभ्या असलेल्या रेल्वेला लागली आग

Tousif Mujawar