Tarun Bharat

केरळमधील श्वान करतोय जगाची भ्रमंती

भटक्या श्वानाला विदेशी जोडप्याने घेतले होते दत्तक

एखाद्या श्वानाला कारला बांधून खेचत नेल्याचे तसेच श्वानाला बडवल्याचे वृत्त दररोज समोर येत असते. पण काही वृत्तं चांगली देखील असतात. सर्वच माणसं चुकीची नसतात यावर विश्वास ठेवायला लावणाऱया या घटना असतात. युक्रेनमधील एका जोडप्याने श्वानाच्या पिल्लला उन्हात उपाशीपोटी भटकताना पाहिल्यावर त्याला दत्तकच घेतले.

2017 मध्ये क्रिस्टिना मॅसालोवा आणि इग्यून पेट्रस हे भारतातील कोची येथे पोहोचले होते. तेथेच त्यांनी गल्लीत फिरत असलेल्या श्वानाच्या पिल्लाला दत्तक घेतले. या श्वानाला त्यांनी ‘चपाती’ नाव दिले. आता 4 वर्षांपेक्षा अधिक काळानंतर या श्वानाचे नाव इंडियन बुक ऑफ रिकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे. त्याला ‘द मोस्ट ट्रव्हल्ड डॉग’ असा मान मिळाला आहे.

जग पाहतोय

ट्रव्हलिंग डॉग चपाती या नावाने या श्वानाचे एक पेज देखील आहे. त्यात या श्वानाला 33 हजार लोक फॉलो करतात. क्रिस्टिना आणि इग्यून यांनी अनेक वर्षांपूर्वी विवाह केला होता. त्यांनी बाळगलेल्या श्वानाचा मृत्यू ओढवला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःचा देश सोडत जगभ्रमंतीस प्रारंभ केला. श्वानासोबत राहत असलेल्या जागी राहणे अवघड ठरले होते. क्रिस्टिता याचा सर्व दोष स्वतःलाच देत होती असे इग्यून यांनी सांगितले.

केरळमध्ये घेतले दत्तक

केरळमध्ये हिंडण्यासाठी पोहोचल्यावर त्यांची भेट झाली ती अशक्त अशा श्वानाच्या पिल्लाशी. त्याला पाहताच त्यांनी दत्तक घेतले. चपाती त्यांच्या जीवनात आल्यापासून ते प्रवास करत आहेत. हे जोडपे चपातीला स्वतःची मुलगीच मानतात.

युक्रेनला भेट मागील 1.5 वर्षांपासून ते युक्रेनमध्ये आहेत आणि चपातीसोबत ते नजीकच्या भागांमध्ये फिरत आहेत. पण चपातीने आतापर्यंत 30 देश आणि 116 शहरांना भेट देत 55,000 किलोमीटरचा प्रवास केला आहे. या श्वानाने 14 बेटे पाहिली असून 11 समुद्रांचा अनुभव घेतला आहे. भारतीयांना भटक्या श्वानांबद्दल जागरुक होणे गरजेचे आहे. त्यांना चांगले जीवन देण्यासाठी काम केले जावे असे क्रिस्टिना सांगते.

Related Stories

मृतदेहांना पुन्हा जिवंत करण्याचा प्रयोग

Patil_p

अति पिण्यामुळे…

Patil_p

सर्वात उंचीवरील पोस्ट ऑफिस भारतात

Patil_p

5G सुपरफास्ट…लवकरच…!

Abhijeet Khandekar

नवरात्री सोहळय़ाचे प्रांतिक रंग

Patil_p

शिवजयंती शिवसंस्कारांची…

Tousif Mujawar