Tarun Bharat

केरळमध्ये गिर्यारोहकाची आश्चर्यकारक सुटका

Advertisements

लष्कर-वायुसेनेचे यशस्वी मदतकार्य ः दुर्घटनेनंतर टेकडीच्या मधोमध दोन दिवस अडकला तरुण

पलक्कड / वृत्तसंस्था

केरळमध्ये पलक्कडच्या मलमपुझा भागात ट्रेकिंगदरम्यात खडकात अडकलेल्या 20 वषीय तरुणाची लष्कर आणि हवाई दलाने आश्चर्यकारकपणे सुटका केली आहे. मलमपुझामध्ये बाबू हा गिर्यारोहक विचित्र पद्धतीने अडकला होता. निसरडय़ा वाटेवरून पाय घसरल्याने हा तरुण दरीत पडला होता. पडत असताना त्याला एका गुहेसारख्या पोकळी असलेल्या जागेचा आधार मिळाला होता. त्याला सुखरूप बाहेर काढणे हे मुश्कील बनले होते. मात्र, लष्कर आणि हवाई दलाच्या जवानांनी व्यापक बचाव मोहीम हाती घेत तिसऱया दिवशी म्हणजे बुधवारी त्याची सुखरुपपणे सुटका केली.

20 वषीय बाबू सोमवारी दोन मित्रांसह चेराड टेकडीवर टेकिंगसाठी गेला होता. मात्र, अन्य दोन मित्रांनी गिर्यारोहण अर्धवट सोडल्यामुळे तो एकटाच पडला होता. याचदरम्यान मित्रांचा साथ सोडूनही बाबू माथ्यावर असलेल्या डोंगराला लक्ष्य करत पुढे जात राहिला. त्याचवेळी तो लक्ष्यापासून काही अंतरावर असताना अचानक त्याचा तोल गेला आणि त्याचा पाय घसरल्यामुळे बाबू खडकाळ भागाच्या मध्यभागी असलेल्या खड्डय़ात अडकला होता. जवळपास दोन दिवस तो या गुहेसारख्या जागेत बसून होता. त्याच्या सुटकेसाठी सगळे प्रयत्न झाल्यानंतर सैन्याला त्याच्या सुटकेसाठी विनंती करण्यात आली होती. एकूण 34 जवान बाबूला वाचवण्यासाठी बुधवारी पहाटे या डोंगराळ भागात पोहोचले होते.

जवळपास दोन दिवस बाबू अन्न-पाण्याशिवाय होता. बाबूला वाचवण्यासाठी एनडीआरएफचे पथक हेलिकॉप्टरद्वारे पोहोचले होते. मात्र वाऱयाचा वेग जास्त असल्याने त्यांना परत फिरावे लागले होते. अखेरीस त्याच्या सुटकेसाठी सुरक्षा दलाकडे मदत मागितली होती. त्यानंतर बचावासाठी टीमने खास रणनीती आखली होती. मद्रास रेजिमेंटल टीमचे दोन सदस्य टेकडीवर चढले आणि 250 फूट उंचीवरून खाली उतरून बाबूपर्यंत पोहोचले. यानंतर टीमने बाबूला डोंगरावरून खाली नेण्याऐवजी हवाई मार्गाने वाचविण्याचा निर्णय घेतला होता.

हवाई दलाचे बचावकार्य

बाबूसंबंधी माहिती मिळताच बचाव पथक सक्रिय झाले. परंतु बाबू इतक्मया उंचीवर होता की बचाव पथक त्याच्यापर्यंत पोहोचण्यात किंवा त्याला अन्न पुरवण्यात अपयशी ठरले. तथापि, त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्नांची शिकस्त केली. तब्बल 48 तास चाललेल्या बचाव मोहिमेनंतर भारतीय हवाई दलाने 20 वषीय तरुणाची सुटका केली आहे. तरुणांचे प्राण वाचवल्याबद्दल मुख्यमंत्री विजयन यांनी सुरक्षा दलातील जवानांचे आभार मानले आहेत.

अन्न-पाण्याविना दिली ऊन-थंडीशी झुंज

डोंगराळ भागातील परिस्थिती ही बाबूसाठी बिकट बनली होती. दिवसा भयंकर ऊन आणि रात्री कडाक्मयाची थंडी अशा वातावरणात बाबूने दोन दिवस काढले होते. या काळात त्याला खाणे तर दूर पाण्याचा एक थेंबही मिळाला नव्हता, असे बचाव पथकातील एका सदस्याने सांगितले. बाबू डोंगराच्या तोंडात अडकल्याचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे, ज्यामध्ये तरुण टी-शर्ट आणि हाप पँन्ट घालून खडकाळ डोंगरभागात एका छोटय़ाशा खड्डय़ात स्वतःला संतुलित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

Related Stories

राजस्थानात ‘मुलींच्या लिलावा’मुळे खळबळ

Patil_p

बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे

Omkar B

बिहारमध्ये नितीशकुमार सरकारला धक्का?

Patil_p

श्रीनगरमध्ये चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; 1 पोलीस शहीद

datta jadhav

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची कोरोनावर मात

Tousif Mujawar

अनिल अंबानींना ‘या’ बँकेच्या निर्णयाने मोठा झटका

Archana Banage
error: Content is protected !!