Tarun Bharat

केरळ ब्लास्टर्स- बेंगलोर एफसी लढत 1-1 अशी बरोबरीत

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील केरळ ब्लास्टर्स आणि बेंगलोर एफसी यांच्यातील रोमहर्षक लढत 1-1 अशी बरोबरीत सुटली. काल हा सामना बांबोळीतील जीएमसी ऍथलेटीक स्टेडियमवर खेळविण्यात आला. मध्यंतराला उभय संघ गोलशून्य बरोबरीत खेळत होते.

दुसऱया सत्रात शेवटच्या 6 मिनिटात दोन गोल झाले. प्रथम 84व्या मिनिटाला बेंगलोर एफसीच्या आशिक कुर्नियानने गोल करून आघाडी घेतली तर शेवटच्या मिनिटाला आशिक कुर्नियानकडूनच सॅल्फ गोल झाल्याने केरळ ब्लास्टर्सचा बरोबरीचा गोल झाला. या निकालाने उभय संघाना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. केरळचे आता 3 सामन्यांतून दोन गुण तर  बेंगलोर एफसीचे तीन सामन्यांतून 4 गुण झाले.

पहिल्या सत्रात बेंगलोर एफसीचे वर्चस्व लढतीवर आढळून आले. त्यांचा कप्तान सुनील छेत्रीने आपले विंगर्स आशिक कुर्नियान आणि उदांता सिंग यांना दोन्ही बगलेतून चेंडू पुरविले. बेंगलोर एफसीसाठी त्यांचा ब्राझिलीयन खेळाडू क्लायटन सिल्वाने चांगला खेळ केला. त्याचे प्रत्येक आक्रमण धोकादायक वाटत होते. केरळ ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनो गोम्सचे गोलरक्षण दुसऱया सत्रात चांगले झाले. एकदा तर अगदी जवळून क्लायटन सिल्वाने मारलेला फटका त्याने ब्लॉक केला व केरळवर होणारा गोल वाचविला. शेवटच्या दहा मिनिटात दोन्ही संघानी वेगवान खेळ केला. 84व्या मिनिटाला हरमनज्योत खाब्राने दिलेल्या पासवर आशिक कुर्नियानने लांबहून मारलेला फटका आल्बिनो गोम्स आपल्या ताब्यात ठेऊ शकला नाही. चेंडू त्याच्या हातातून निसटला व जाळीत गेल्याने बेंगलारच्या गोलची नोंद झाली. त्यानंतर लगेच लॅस्कोविचने मारलेला फटका परतविण्याच्या यत्नात आशिक कुर्नियानने चेंडू आपल्याच गोलात मारल्याने केरळ ब्लास्टर्सची गोलबरोबरी झाली.

Related Stories

उदय पालयेकर यांचे निधन

Amit Kulkarni

पंचसदस्य गोविंद फात्रेकर यांचा गौरव

Amit Kulkarni

सरकारी जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामे थेट पाडणार : मुख्यमंत्री

Amit Kulkarni

SS मोबाईल बिग दिवाळी सेलला प्रचंड प्रतिसाद

Patil_p

ओडिशा एफसी-चेन्नईन लढत 2-2 अशी बरोबरीत

Amit Kulkarni

दहावी, बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा 1 मार्चपासून

Amit Kulkarni