Tarun Bharat

केरळ सरकारच्या वेतन कपात निर्णयाला स्थगिती

वृत्तसंस्था / तिरूअनंतपुरम

सरकारी कर्मचाऱयांच्या सहा दिवसांच्या वेतन कपातीच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मंगळवारी केरळ उच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी स्थगिती दिली. कोरोनामुळे राज्यावर आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर केरळ सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱयांचे पुढील पाच महिन्यांसाठी दर महिन्याला 6 दिवसांच्या वेतन कपातीचा निर्णय घेतला होता. 20 हजारांपेक्षा अधिक वेतन असणाऱयांसाठी हा नियम लागू होता. यापेक्षा कमी वेतन असणाऱयांच्या पगारात कपात होणार नसल्याचेही स्पष्ट केले होते. राज्य सरकारने सर्व मंत्री, आमदार, विविध महामंडळांचे सदस्य, नगरपालिका सदस्य, विविध आयोगांचे वेतनामध्ये पुढील एक वर्ष 30 टक्के कपातीचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

कॅप्टन अमरिंदर सिंग अमित शाहांनंतर आता जी-२३ नेत्यांची घेणार भेट

Archana Banage

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर पंतप्रधान मोदींनी राज्यांना दिला ‘हा’ सल्ला

Archana Banage

रविशंकर प्रसाद यांनी नितीशकुमारना फटकारले

Patil_p

राफेलच्या गर्जनेने चीन बिथरला

Patil_p

कर्नाटकात कोरोनाबाधीत संख्या 8 वर

tarunbharat

विश्वचषक फुटबॉल महासंग्राम आजपासून

Patil_p