Tarun Bharat

केळकरबाग हनुमान मंदिर ट्रस्टतर्फे राम मंदिराला 51 हजारांची देणगी

प्रतिनिधी / बेळगाव

स्वामी विवेकानंद चौक, हनुमान मंदिर ट्रस्ट केळकरबागच्यावतीने अयोध्या येथे होणाऱया राम मंदिरासाठी 51 हजार रुपयांचा धनादेश दिला. मंदिराच्या निर्माणासाठी देशभरात निधी संकलन करण्यात येत आहे.

प्रत्येक नागरिक आपल्याला शक्मय असेल तेवढा निधी राम मंदिराच्या निर्माणासाठी देत आहे. धनादेश देतेवेळी मंदिर ट्रस्टचे विलास सरोळकर, विलास पै, विवेक मालशेट, सुनील महाजन, उत्तम अडगुणकर, उदय जोशी, राजू लोंढे, मुकुंद जोशी, गुरुनाथ किरमिटे, बबन भोबे, उदित रेगे, सुनील गुडमट्टी, सर्वेश पै उपस्थित होते. विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी विजय जाधव, हेमंत हावळ, अर्जुन रजपूत, रवि कलघटगी, गौरव कुलकर्णी, संजय गुंडकल आदी उपस्थित होते.

Related Stories

ऑनलाईन शिक्षणात मोबाईल रेंजचा अडसर

Patil_p

उद्यानातील ग्लास हाऊसच्या उद्घाटनासाठी आटापिटा

Patil_p

शितल संघाकडे फार्मा क्रिकेट चषक

Amit Kulkarni

बटाटे-रताळय़ांची घसरण तर कांदा दरात वाढ

Patil_p

आयुषी, मोनिष विजेते, यशस्विनी घोरपडेला दुहेरी मुकूट

Amit Kulkarni

डॉ. राजश्री अनगोळ यांचा जायंट्स सखीतर्फे सत्कार

Amit Kulkarni