Tarun Bharat

केळवली बंद; ठोसेघर बहरला!

वार्ताहर/ परळी

विकेंड म्हटलं की, पावसामध्ये चिंब भिजायला सातारचेच नव्हे तर महाराष्ट्रातील कानाकोप्रयातून पर्यटक अगदी पहाटेपासूनच ठोसेघर, भांबवली, कास पठार, चाळकेवाडी पवनचक्की पठार, सज्जनगडकडे येत असतात त्यामुळे या परिसराला जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. त्यातच केळवली धबधब्यात दुर्घटना घडल्याने या परिसरात ग्रामस्थ व पोलिसांनी तपास सुरू असेपर्यंत पर्यटकांना मज्जाव केल्याने या ठिकाणी येणारे पर्यटक ही पुन्हा ठोसेघर सज्जनगडकडे आल्याने दुपारनंतर पुन्हा घाट रस्ता जाम झाला होता. बोगदा ते ठोसेघर व  बोगदा ते कास या रस्त्यावर वाहनांची तोबा गर्दी झाली होती.

 विकेंडला साताऱयाबरोबरच महाराष्ट्रातील पर्यटकांनी ठोसेघर, भांबवली, सज्जनगड परिसर ओसंडून गेला होता. जणू काही ठोसेघर व सज्जनगडावर पर्यटकांचा बहरच आला होता. लांबच्या लांब वाहनांच्या रांगा यामुळे पर्यटक घाट रस्त्यावरच तासंतास अडकून राहिले होते. यावेळी ठोसेघर परिसरात तर पर्यटकांना इकडे कशाला आलो? अशीच अवस्था झाली होती. कारण पर्यटकाबरोबरच हुल्लडबाज पर्यटक, ड्रंकन ड्राईव्ह, ब्रेशिस्त पार्किंग यामुळे पर्यटक तासंतास अडकून पडले होते तर कधी वादावादीचे प्रकारही घडत होते.

तासनतास रखडल्याने पर्यटकांचा हिरमोड

सुट्टीचा वार म्हटलं की निसर्गाच्या सानिध्यात निवांतपणे मुक्त उधळण करण्याचा दिवस असाच निसर्गप्रेमींसाठी असतो. यासाठीच परळी खोयात विकेंडला शेकडो पर्यटक दाखल होत असतात मात्र केळवली धबधबा दुर्घटनेमुळे बंद असल्याने तेथील पर्यटक ठोसेघर सज्जनगड या ठिकाणी वळू लागल्याने या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला.

Related Stories

लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृतीवर भर द्या

datta jadhav

22 हजार हेक्टरपेक्षा अधिक कृषी क्षेत्र बाधित

Patil_p

जिहे-कटापूर योजनेस केंद्रीय निधी देणार

Patil_p

सातारा जिल्हय़ात आजपासून हाफ लॉकडाऊन

Archana Banage

सातारा : 122 कोरोना बाधित रुग्णांची जिल्हा प्रशासनाने ३३ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम परत मिळवून दिली

Archana Banage

तेजस शिंदेंचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

Patil_p
error: Content is protected !!