Tarun Bharat

केळोशी बु॥ येथे विनापरवाना चिखलगुठ्ठा शर्यती; आयोजकावर गुन्हा दाखल

Advertisements

राधानगरी / प्रतिनिधी

केळोशी बुद्रुक ता. राधानगरी येथे विनापरवाना बैलांच्या चिखलगुठ्ठा शर्यतीचे आयोजन रविवारी करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी रोख रकमेसह विविध बक्षिसे ठेवण्यात आली होती. आयोजकांनी सोशल मीडियावरती स्पर्धेचे जाहिरात केल्याने स्पर्धा पाहण्यासाठी हजारो शर्यत शौकीनांनी येथे हजेरी लावली. बैलगाडी शर्यतीवरती न्यायालयाची बंदी असताना स्पर्धा घेतल्याने १५ जणांच्या वरती राधानगरी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतची फिर्याद केळोशीचे पोलीस पाटील शशिकांत दिघे यांनी दिली.

राधानगरी तालुक्याच्या पश्चिम परिसरामध्ये शेतीची सर्व कामे आटोपली आहेत. त्यामुळे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात चिखलगुठ्ठा स्पर्धेचे आयोजन परिसरातील गावांच्यामध्ये केले जाते. केळोशी बुद्रुक येथे बेकायदेशीरपणे यावर्षी चिखलगुठ्ठा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यासाठी कोणतीही शासकीय परवानगी घेण्यात आलेली नाही स्पर्धेसाठी रोख रकमेसह विविध बक्षिसे ठेवण्यात आली होती. आयोजकांनी या स्पर्धेची जाहिरात सोशल मीडियावरून जोरात केली. त्यामुळे रविवार २६ रोजी हजारो शर्यत शौकिनांनी स्पर्धेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. कोरोना संकट सर्वत्र घोंगावत असतानाच कोणत्याही पद्धतीचे सोशल डिस्टिंक्शन व विना मास्क शर्यत शौकिन स्पर्धेच्या ठिकाणी फिरत होते. सोशल मीडियावर या स्पर्धेचे चित्रीकरण व्हायरल झाले.

बैलगाड्यांच्या शर्यतीवर सरकारने बंदी घातली आहे. मुक्या जनावरांच्यावर केल्या जाणाऱ्या अत्याचारामुळे व विनापरवाना ही स्पर्धा घेतल्याने येथील १५ आयोजकांच्यावरती गुन्हा नोंद झाला आहे. स्पर्धेचे आयोजक राहुल पिलावरे, संभाजी चौगले, महिपती पाटील, आनंदा पिलावरे, गंगाराम पाटील, जोतीराम चौगले यांच्यासह पंधरा जणांच्या व गुन्हे नोंद करण्यात आले. अधिक तपास राधानगरीचे एपीआय शितलकुमार.डोईजड , पोलीस कॉन्स्टेबल अमर कुंभार करत आहेत.

Related Stories

कोल्हापूर : बेकायदेशीर पानमसाला विक्री करणाऱ्या एकास अटक

Abhijeet Shinde

मराठा समाजाने आंदोलनासाठी बांधली पुन्हा वज्रमूठ

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यातील १०० केंद्रांवर लसीचा तुटवडा

Abhijeet Shinde

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कसबा बीड येथे राजाभोज उद्यानासाठी विविध उपक्रम

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : रिक्षा चालकांच्या अनुदानासाठी नोंदणी सुरू

Abhijeet Shinde

न्यू कॉलेजचे माजी ग्रंथपाल प्रा. पी. सी. पाटील यांचे निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!