23 वर्षांपासून कधीच जेवली नाही, धान्याबद्दल तिला वाटते प्रचंड भीती
ब्रिटनमध्ये राहणाऱया एक 25 वर्षीय युवती मागील 23 वर्षांपासून सँडविच आणि चिप्स खाऊन जगत आहे. वयाच्या दोन वर्षांपासून ती याच दोन्ही गोष्टी खात आहे. लंच आणि डिनरमध्ये देखील ती केवळ चिप्सच खात असते.
सँडलरने प्रत्येक दिवस स्वतःच्या पसंतीचे ओनियन आणि चीज चिप्स तसेच सँडवा खाऊन घालविला आहे. 2 वर्षांची असताना तिला चिप्स आणि सँडविच इतके आवडले की ती त्याशिवाय अन्य काहीच खात नाही. दरदिनी लंचपासून डिनरपर्यंत ती केवळ ओनियन आणि चीजयुक्त चिप्स आणि सँडविच खात राहिली आहे.


सँडलरच्या आईवडिलांनी तिला अन्य गोष्टी खाण्यास शिकविण्याचा मोठा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. नाश्त्यात ड्राय सीरियल आणि मग लंच अन् डिनरमध्ये क्रिस्प सँडविच खाऊन तिचे पोट भरते.
सँडलरच्या या सवयीचे कारण मल्टीपल स्केलेरोसिस नावाचा आजार आहे. यात जंक फूड खाणे अत्यंत धोकादायक मानले जाते. ज्यानंतर तिला आता एका थेरपिस्टच्या मदतीने अन्य खाद्यपदार्थांची चव मिळवून दिली जात आहे. हिप्नोथेरपिनिस्ट डेव्हिड किल्मुरी तिला नव्या खाद्यपदार्थांमध्ये रुची निर्माण करण्यास मदत करत आहेत.
सँडलर आता काही फळे आणि ग्रेव्हीयुक्त भाज्या खाऊ लागली आहे. 2-2 तासांच्या सत्रानंतर ती नव्या गोष्टी खाण्याचा प्रयत्न करत आहेत. करी आणि अन्य विविध खाद्यपदार्थांची चव घेण्यास मी उत्सुक असल्याचे ती सांगते. सँडलरला नियोफोबियाची समस्या असून यात लोक केवळ एकाचप्रकारचा आहार घेणे पसंत करतात. अशा लोकांना अन्य खाद्यपदार्थांची भीती वाटू लागते असे डेव्हिड यांनी म्हटले आहे.