Tarun Bharat

केवळ झोपण्यासाठी बसमधून प्रवास

हाँगकाँगच्या बस टूर कंपनीची अनोखी सेवा

सध्याचे धावपळीचे जीवन आणि कामामुळे अनेकदा लोकांची झोप पूर्ण होत नाही. तर काही लोकांना स्वतःच्या घरातील गोंगाटयुक्त वातावरण किंवा अन्य कारणांमुळे झोप नाही, असे लोक दीर्घ प्रवासादरम्यान कार, रेल्वे, बस किंवा फ्लाइटमध्ये सहजपणे स्वतःची झोप पूर्ण करतात. प्रवास करताना झोप येणे ही सामान्य बाब आहे. विशेषकरून बसचा प्रवास करताना थंड हवेच्या शिडकाव्याने डोळे बंद होऊ लागतात. अशा लोकांसाठी एका कंपनीने अनोखी सेवा सुरू केली आहे.

घरात झोप लागत नसल्याची तक्रार करणाऱया लोकांसाठी एका ट्रव्हल कंपनीने बससेवा सुरू केली आहे. हाँगकाँगची बस टूर कंपनी ऊलू ट्रव्हलने ही अनोखी सुरुवात केली असून यात प्रवासादरम्यान झोप पूर्ण करण्याची सुविधा देण्यात येतेय.

 5 तासांच्या या बसप्रवासासाठी लोकांना तिकिट घ्यावे लागेल, पण याचा वापर ते एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नव्हे तर केवळ झोपण्यासाठी करू शकतील. कंपनीची ही डबलडेकर बस शहराची 47 किलोमीटरची प्रदक्षिणा 5 तासांमध्ये पूर्ण करते. त्यानंतर प्रवास सुरू झालेल्या ठिकाणीच प्रवाशांना आणून सोडते.

प्रवासभाडे अन् सुविधा

या बसचे प्रवासभाडे तुम्ही कुठली सेवा निवडता त्यावर अवलंबून असणार आहे. तिकिटाची किंमत डेक आणि आसनांच्या स्थितीच्या आधारावर निश्चित करण्यात आली आहे. प्रवास करण्यासाठी तिकिटाच्या किमती 1 हजार रुपयांपासून 3,800 रुपयांपर्यंत आहेत. या अनोख्या बसमध्ये प्रवाशांना उत्तम झोप लागावी म्हणू त्यांना आय मास्क आणि ईयर प्लग देखील दिले जातात.

स्लीपिंग बस टूर

स्लीपिंग बस टूरची सुरुवात काही दिवसांपूर्वीच झाली आहे. याच्या पहिल्या टूरची सर्व तिकिटे काही तासातच विकली गेली होती. प्रवास सुरू होण्यापूर्वी ही बस एका हॉटेलजवळ थांबते, जेथे सर्व प्रवासी पोटभर जेवतात, जेणेकरून रात्री चांगली झोप लागू शकेल. त्यानंतर बस मंदगतीने धावत राहते. 5 तासांच्या प्रवासानंतर बस सुरुवातीच्या ठिकाणी येऊन थांबते.

Related Stories

अमेरिकेत चेंगराचेंगरीत आठ जणांचा मृत्यू

Patil_p

ब्रिटन चीनच्या ‘हुआवेई’ला 5G नेटवर्कमधून हटवणार

datta jadhav

बायडन यांनी शब्द पाळला; पदभार स्वीकारल्यानंतर घेतले ‘हे’ निर्णय

Tousif Mujawar

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 5 कोटींवर

datta jadhav

नेपाळकडून सीमाभागात रस्ते बांधणीच्या कामाला वेग

datta jadhav

चीनने बळकावली नेपाळची 33 हेक्टर जमीन

datta jadhav