Tarun Bharat

केवळ पुरी येथील रथयात्रेला अनुमती

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाच निर्णय

त्तसंस्था / नवी दिल्ली

ओडिशामध्ये पुरीसमवेत अनेक हिस्स्यांमध्ये रथयात्रांना अनुमती देण्याची मागणी करणाऱया याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. म्हणजेच आता पुरी येथील जगन्नाथ मंदिर परिसर वगळता राज्यात अन्यत्र कुठेच रथयात्रा काढण्याची अनुमती नसणार आहे. कोरोना संकटामुळे राज्य सरकारने केवळ पुरी जगन्नाथ मंदिर परिसरात रथयात्रेला अनुमती दिली आहे.

भगवान पुढील वर्षी यात्रेची अनुमती देतील अशी अपेक्षा न्यायालयाला आहे. पण सध्या रथयात्रा काढण्यासाठी अनुकूल वेळ नसल्याचे सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश एन.व्ही. रमना यांनी म्हटले आहे. कोरोना संक्रमण पाहता महामारी फैलावण्याची भीती आहे. याचमुळे ओडिशा सरकारच्या आदेशाशी सहमती असल्याचे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. कोरोनामुळे केवळ पुरीत रथयात्रेला अनुमती देण्याच्या ओडिशा सरकारच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

मागील वर्षी पहिल्यांदा आम्हाला धार्मिक विधी करण्यापासून रोखण्यात आले होते. पण यंदा आम्ही सर्व नियमांचे पालन करत तयारी केली आहे. पुरी मंदिराला अनुमती देण्यात आलेली असल्याने नीलगिरि, सत्संग, बारीपदा येथील रथयात्रेला अनुमती द्यावी असे याचिकाकर्त्यांचे वकील ए.के. श्रीवास्तव यांनी सुनावणीवेळी म्हटले होते.

राज्य सरकारने पुरी येथील रथयात्रेला काही अटींसह अनुमती दिली आहे. रथ खेचणाऱया 500 लोकांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाणार आहे. 12 जुलै रोजी भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेला प्रारंभ होणार आहे.

Related Stories

स्टेट बँकेचे गृहकर्ज होणार स्वस्त

Omkar B

पुलवामातील हल्ल्यात सुरक्षा अधिकारी हुतात्मा

Patil_p

कुपवाडा येथे चकमकीत लष्करी जवान हुतात्मा

Patil_p

नापीक भूमीत पिकविली सफरचंदं

Patil_p

अण्णाद्रुमकचे निवडणूक चिन्ह कायम राहणार

Amit Kulkarni

उत्पादन क्षेत्राचा 8 वर्षांमधील उच्चांक

Patil_p